प्रशासनाच्या पैसेवारीवर प्रश्नचिन्ह?

By admin | Published: January 3, 2016 12:05 AM2016-01-03T00:05:03+5:302016-01-03T00:05:03+5:30

उत्तर तालुका; शेजारच्या तालुक्याची पैसेवारी कमी कशी?

Questionnaire questionnaires on administration | प्रशासनाच्या पैसेवारीवर प्रश्नचिन्ह?

प्रशासनाच्या पैसेवारीवर प्रश्नचिन्ह?

Next
्तर तालुका; शेजारच्या तालुक्याची पैसेवारी कमी कशी?
सोलापूर: इकडे मोहोळ, तिकडे बार्शी,दक्षिण सोलापूर तर शेजारी तुळजापूर तालुक्याच्या हद्दीवरील गावांची आणेवारी(पैसेवारी) 50 पैशांपेक्षा कमी असताना उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांची आणेवारी मात्र 50 पैशांपेक्षा अधिक दाखविली आहे. उत्तर सोलापूर तालुक्याला कोणीच कारभारी नसल्याने जिल्हाधिकार्‍यांचे प्रशासन म्हणेल तेच खरे असे सध्याचे चित्र आहे.
तहसीलदारांच्या अहवालानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने 31 डिसेंबर रोजी नजरआणेवारी जाहीर केली आहे. या आणेवारीनुसार सर्वच महसुली 54 गावांची आणेवारी 51 ते 57 इतकी दाखविण्यात आली आहे. उत्तर सोलापूर तालुक्याच्या सरहद्दीवर मोहोळ, बार्शी, दक्षिण सोलापूर व तुळजापूर तालुक्यातील गावे आहेत. या बहुतेक गावांची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी दाखविण्यात आली आहे, परंतु लगतच्या उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांचीच आणेवारी 50 पैशांपेक्षा अधिक कशी असा प्रश्न शेतकर्‍यांकडून उपस्थित होत आहे.
0 तालुक्यातील खेडची सर्वाधिक 57 पैसे, बाळे व रानमसलेची आणेवारी प्रत्येकी 56 पैसे दाखवली.
0 समशापूर, डोणगाव, कुमठे, कवठे, बेलाटी, तळेहिप्परगा, एकरुख, पाथरी, बाणेगाव, भोगाव, कारंबा, गुळवंची या गावांची आणेवारी प्रत्येकी 55 पैसे दाखवली.
0 राळेरास, होनसळ, बीबीदारफळ, अकोलेकाटी, मार्डी, हगलूर, भाटेवाडी, प्रतापनगर, सोरेगाव, दहिटणे, शेळगी, सलगरवाडी या गावांची आणेवारी 54 पैसे.
0 नेहरुनगर, कोंडी, तिर्‍हे, देगाव, बसवेश्वरनगर, नरोटेवाडी, तरटगावची पैसेवारी 53 पैसे.
0 पडसाळी, इंचगाव, नान्नज, सेवालालनगर, तेलगाव, केगावची आणेवारी 52 पैसे.
0 कसबे सोलापूर, मजरेवाडी, शिवाजीनगर, पाकणी ,शिवणी, हिरज, वडाळा, गावडीदारफळ, कौठाळी, भागाईवाडी, कळमण व वांगीची आणेवारी 51 पैसे.
0 तालुक्यात लागवडीखालील सर्वाधिक 3320 हेक्टर क्षेत्र बीबीदारफळ, त्यापाठोपाठ वडाळ्याचे 3 हजार 10 तर रानमसल्याचे 2974 हेक्टर आहे.
चौकट
शहरातील पिकेही साधारण..
कुमठे, मजरेवाडी, कसबे सोलापूर, नेहरुनगर, शिवाजीनगर, शेळगी, दहिटणे या शहराच्या भागातील पिकेही समाधानकारक असल्याचे तलाठी व मंडल अधिकार्‍यांनी दाखवले आहे. उत्तर तालुक्यातील शेजारच्या मोहोळ, बार्शी, दक्षिण सोलापूर, तुळजापूर तालुक्यातील हाकेच्या अंतरावरील गावांची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी असेल तर उत्तर सोलापूर तालुक्यातील आणेवारी 50 पैक्षा अधिक कशी?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चौकट
टँकरने कांद्याला पाणी तरीही..
रानमसले, पडसाळी या गावांचे पाण्यासाठीचे हाल सुरू आहेत. कांदा पिकावर अवलंबून असलेल्या इथल्या शेतकर्‍यांनी कांद्याला टँकरने पाणी दिले. टँकरसाठी पैसे खर्च करणार्‍या शेतकर्‍यांच्या हातात कांद्याचे हजाराच्या पटीतही पैसे पडले नाहीत. असे असताना रानमसलेची आणेवारी 56 तर पडसाळीची 52 पैसे आणेवारी लावली आहे.
कोट
तलाठी व मंडल अधिकार्‍यांनी दिलेल्या अहवालानुसार ही नजरआणेवारी लावली आहे. ही आणेवारी अंतिम नाही. तलाठी व मंडल अधिकार्‍यांनी सर्वच मंडलामध्ये सध्या पीक परिस्थिती साधारण असल्याचे अहवालात म्हटले आहे.
लिना खरात
नायब तहसीलदार, उत्तर सोलापूर

Web Title: Questionnaire questionnaires on administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.