कल्पनारम्य धाडस करणारे देश चालवू शकत नाहीत, मुखर्जींनी मोदींचे कान टोचले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 09:46 AM2019-04-09T09:46:13+5:302019-04-09T09:47:44+5:30
नवी दिल्लीतील कार्पोरेट एआयएमए मॅनेजिंग अवॉर्ड सोहळ्यात मुखर्जी बोलत होते.
नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कान टोचले आहेत. विशेष म्हणजे कार्पोरेट क्षेत्रातील एका पुरस्कार सोहळ्यातच मुखर्जी यांनी नाव न घेता मोदींना लक्ष्य केलं. देशातील लोकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करेल आणि सोडवू शकेल, अशाच नेत्याची देशाला गरज आहे. केवळ कल्पनारम्य धाडस दाखवून देश कधीही प्रगतीपथावर जाऊ शकत नाही, असे म्हणत नोटाबंदीच्या निर्णयावरुन मुखर्जींनी मोदींवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
नवी दिल्लीतील कार्पोरेट एआयएमए मॅनेजिंग अवॉर्ड सोहळ्यात मुखर्जी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, देश गेल्या कित्येक वर्षांपासून दारिद्र्याची लढाई लढतो आहे. त्यासाठी कार्पोरेट क्षेत्राने पुढे आले पाहिजे, देशातील 1 टक्के लोकांकडे देशातील 60 टक्के पैसा असून ही चिंताजनक बाब आहे. आयएमएफच्या आकडेवाडीनुसार भारत हा जगातील सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. देशाची अर्थव्यवस्था ही युएसडी 2.69 ट्रिलियन्स एवढी आहे. सध्या मार्च 2019 चा भारताचा विकासदर 7.4 असून पुढील वर्षी म्हणजे 2019-20 मध्ये हा विकासदर (जीडीपी) 7.6 टक्क्यांपर्यंत पोहोचणे अपेक्षित असल्याचेही मुखर्जी यांनी म्हटले.
Former President Pranab Mukherjee: While it is good to have a rising number of India billionaires in the Forbes list, it is much more important to have a growing number of the middle income Indians every year. (08.04.2019) https://t.co/UNrXgJtUNe
— ANI (@ANI) April 9, 2019
देशातील कार्पोरेट वर्गाने पुढे येऊन देशातील बेरोजगारी आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. वैयक्तिक नव्हे, तर रोजगार निर्मित्ती, सामाजिक उपक्रम आणि देशाच्या अर्थिक विकासाची धोरणं राबविली पाहिजेत. त्यासोबतच आरोग्य क्षेत्राकडेही लक्ष देणं गरजेचं असल्याचे मुखर्जी यांनी या परिषदेत बोलताना म्हटले आहे.