रा. सू. गवईंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By admin | Published: July 26, 2015 11:38 PM2015-07-26T23:38:25+5:302015-07-26T23:38:25+5:30
- बौद्ध धर्मानुसार सोपस्कार
Next
- ौद्ध धर्मानुसार सोपस्कार दारापूर (जि.अमरावती) : वंचितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे रामकृष्ण उपाख्य दादासाहेब गवई यांच्या पार्थिवावर दर्यापूर तालुक्यातील दारापूर या त्यांच्या मूळ गावी सायंकाळी ६.२० वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ पुत्र न्यायमूर्ती भूषण आणि धाकटे पुत्र डॉ. राजेंद्र यांनी पार्थिवाला अग्नी दिला. महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती तथा बिहार व केरळ राज्यांचे माजी राज्यपाल दादासाहेब गवई यांचे तिरंग्यात गुंडाळलेले पार्थिव पार्थिव डॉ. सौ. कमलताई गवई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणातील एका चौथर्यावर ठेवण्यात आले. दादासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी लोटलेल्या जनसागराने येथे त्यांचे अंत्यदर्शन घेतले. साधारणत: तासाभरानंतर बौद्ध धर्मानुसार नागार्जुन सुरई ससाई, खेम धम्मो, चंद्रमणी, सुमेध बोधी या प्रमुख भतेंच्या मार्गदर्शनात दादासाहेबांच्या पार्थिवावर विधिवत सोपस्कार करण्यात आलेत. त्यानंतर हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून दादासाहेबांना सलामी दिल्यावर भूषण आणि राजेंद्र यांनी पार्थिवाला अग्नि दिला. (प्रतिनिधी)------------११ न्यायमूर्तीर्ंची उपस्थितीदादासाहेबांच्या या अंत्यसंस्कार सोहळ्याला उच्च न्यायालयाच्या ११ न्यायमूर्तींची उपस्थिती होती.