रेवणसिद्धेश्वरांच्या पालखी सोहळ्यास प्रारंभ दर्शनासाठी गर्दी : शेवटच्या रविवारी रथोत्सव

By admin | Published: August 16, 2015 11:44 PM2015-08-16T23:44:27+5:302015-08-16T23:44:27+5:30

सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचे गुरुवर्य असलेले जगद्गुरु श्री रेवणसिद्धेश्वरांच्या पालखी सोहळ्यास रविवारपासून उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. कंबर तलावासमोरील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरात भाविकांनी रविवारी दिवसभर गर्दी केली होती. पालखी सोहळ्याला सुमारे १२५ वर्षांची परंपरा आहे.

Rabindra rathotsav for the darshan of Ravanasiddheshwar | रेवणसिद्धेश्वरांच्या पालखी सोहळ्यास प्रारंभ दर्शनासाठी गर्दी : शेवटच्या रविवारी रथोत्सव

रेवणसिद्धेश्वरांच्या पालखी सोहळ्यास प्रारंभ दर्शनासाठी गर्दी : शेवटच्या रविवारी रथोत्सव

Next
लापूर : ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचे गुरुवर्य असलेले जगद्गुरु श्री रेवणसिद्धेश्वरांच्या पालखी सोहळ्यास रविवारपासून उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. कंबर तलावासमोरील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरात भाविकांनी रविवारी दिवसभर गर्दी केली होती. पालखी सोहळ्याला सुमारे १२५ वर्षांची परंपरा आहे.
यंदाच्या श्रावण महिन्यात पाच रविवार आले असून, पहिल्या चार रविवारी पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. शेवटच्या पाचव्या रविवारी रथोत्सव साजरा केला जातो. आज (रविवारी) भवानी पेठेतील श्री रेवणसिद्धेश्वर मंगल कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. तेथून चिद्रे वाड्यात पालखीचे आगमन होते. सुशोभित आणि फुलांची सजवलेल्या चांदीच्या पालखीत श्री रेवणसिद्धेश्वरांची मूर्ती ठेवून विधिवत पूजा केली जाते. सकाळी साडेनऊ वाजता चिद्रे वाड्यातून पालखीचे प्रस्थान झाले. तेथून पालखी मिरवणूक जुना अडत बाजार, माणिक चौक, विजापूरवेस, जिल्हाधिकारी कार्यालयमार्गे गुरुभेट येथे आली. तेथे विसावा घेऊन पालखी पुन्हा रेवणसिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाली. मंदिरात विधिवत पूजा आणि महाप्रसादानंतर पालखी सोहळा चिद्रे वाड्याकडे प्रस्थान झाला. पालखी मिरवणुकीत चंद्रकांत हिंगमिरे, अशोक चाकोते, राजेंद्र इंडे, बसवराज हिंगमिरे, अजित यादवाड, नगरसेवक उदयशंकर चाकोते, युवराज चाकोते, मल्लिनाथ सोलापुरे, सागर अतनुरे, कलशे˜ी आदी सामील झाले होते.
इन्फो बॉक्स
पालखी सोहळ्यापासून समाज दूर
गेल्या अनेक वर्षांपासून पालखी सोहळा पार पडत असताना लिंगायत समाजातील मंडळी मात्र यापासून दूर असतात. २०-२५ वर्षांपूर्वी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा साजरा व्हायचा. मात्र अलीकडे बोटावर मोजण्याइतपत मंडळींवर पालखी सोहळ्याची जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार पाडत असताना समाजातील इतर मंडळी केवळ बघ्याची भूमिका घेत असतात. यंदाच्या पालखी सोहळ्यात आणि रथोत्सवात हजारोंच्या संख्येने समाजातील स्त्री-पुरुष भाविकांनी सामील व्हावे, असे आवाहन चंद्रकांत हिंगमिरे, युवराज चाकोते, सागर अतनुरे, राजेंद्र इंडे आदींनी केले आहे.

Web Title: Rabindra rathotsav for the darshan of Ravanasiddheshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.