राबडी देवी संतापल्या अन् म्हणाल्या..."योगी आदित्यनाथ यांनाच बिहारमध्ये आणा, कुणी अडवलंय?"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 09:25 PM2022-03-30T21:25:08+5:302022-03-30T21:26:03+5:30

राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) ज्येष्ठ नेत्या राबडी देवी यांनी बुधवारी बिहारमधील ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली.

rabri devi furious over law and order says bring yogi adityanath to bihar only | राबडी देवी संतापल्या अन् म्हणाल्या..."योगी आदित्यनाथ यांनाच बिहारमध्ये आणा, कुणी अडवलंय?"

राबडी देवी संतापल्या अन् म्हणाल्या..."योगी आदित्यनाथ यांनाच बिहारमध्ये आणा, कुणी अडवलंय?"

Next

पाटणा-

राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) ज्येष्ठ नेत्या राबडी देवी यांनी बुधवारी बिहारमधील ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. "बिहारमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आणा, तुम्हाला कुणी थांबवलंय?", असा संताप राबडी देवी यांनी बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत व्यक्त केला. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ओळखले जातात आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हा महत्वाचा मुद्दा होता. 

"राज्यात असा एकही जिल्हा नाही जिथं रोज खून आणि लूटमार होत नाही. सरकारच दुबळं आहे, सरकार मजबूत असतं तर या घटना घडल्या नसत्या. सरकार सक्षम असतं तर आम्हीही मदत केली असती", असं राबडी देवी म्हणाल्या. बिहारमध्ये योगी मॉडेल लागू करण्याच्या भाजप आमदारांच्या मागणीचीही राबडी देवी यांनी खिल्ली उडवली आणि म्हणाल्या, "नितीश कुमारांना तिकडे पाठवा आणि योगीजींना बिहारमध्ये आणा. तुम्हाला कुणी अडवलंय? डबल इंजिन सरकार आहे ना?"

'सरकारनं सारंकाही अधिकाऱ्यांवर सोडलं'
"सरकारनं संपूर्ण राज्य प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सोडलं आहे", अशी टीका राबडी देवी यांनी केली. विधानसभेत दारूबंदी दुरुस्ती विधेयक मांडण्याबाबत विचारले असता माजी मुख्यमंत्र्यांनीही टीका केली. "दारू बंदी कुठे आहे? दारू सर्वत्र उपलब्ध आहे. ६ वर्षे झाली, तुम्ही काय साध्य केलं?'', असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी नितीश कुमार यांच्यावर ताशेरे ओढले आणि ते काहीही करू शकतात, असा टोला लगावला. 

'नितीश कुमार मोदींच्या पायावर पडले'
नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींसमोर हात जोडून अभिवादन करताना आणि त्यांना वाकून नमस्कार केलेल्या प्रसंगावरुनही राबडी देवी यांनी टीका केली. "नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पाया पडले. योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी नितीश उपस्थित होते. पंतप्रधानांच्या पाया पडणंही लाचारी नाही का?", असा हल्लाबोल राबडी देवींनी यावेळी केला.

 

Web Title: rabri devi furious over law and order says bring yogi adityanath to bihar only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.