पाकला खडसावले

By admin | Published: January 24, 2015 02:39 AM2015-01-24T02:39:28+5:302015-01-24T02:39:28+5:30

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारत दौऱ्याच्या तोंडावर दहशतवादी कारवायांवरून पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत खडसावले.

Racked up | पाकला खडसावले

पाकला खडसावले

Next

दहशतवाद्यांचे नंदनवन नको : ओबामांचा स्पष्ट शब्दांत इशारा

नवी दिल्ली : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारत दौऱ्याच्या तोंडावर दहशतवादी कारवायांवरून पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत खडसावले. दहशतवाद्यांना पाकिस्तानने आश्रय देणे, किंबहुना ते अतिरेक्यांचे नंदनवन बनणे खपवून घेतले जाणार नाही, हे खडसावून सांगतानाच त्यांनी मुंबई हल्ल्यातील आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली. त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्याचे फर्मानच त्यांनी पाकिस्तानला सोडले.
भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत दहशतवादविरोधी लढ्यातली अमेरिकेची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगत ओबामा म्हणाले, की आम्ही दहशतवादविरोधी लढ्यात पाकिस्तानसोबत काम करीत आहोत. मात्र पाकमध्ये दहशतवाद्यांना अभय
देण्याची बाब खपवून घेतले जाणार नाही. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील
आरोपी न्यायालयीन खटल्यास सामोरे गेले पाहिजे. २६ नोव्हेंबर २००८ रोजीच्या मुंबई हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारास शिक्षा देण्याबाबत पाकिस्तानच्या गांभीर्याबाबत नव्याने सवाल उपस्थिती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ओबामांच्या या विधानास महत्त्व प्राप्त झाले आहे.
हल्ल्याचा सूत्रधार जकिउर रहमान लख्वीला पाकिस्तानी न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर भारताकडून सवाल उपस्थित होत आहेत. न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यात काही भारतीयांनी जीव गमावला होता, तर २६ /११ च्या मुंबईवरील हल्ल्यात अमेरिकी नागरिकही मृत्युमुखी पडले होते, याकडे ओबामांनी लक्ष वेधले.
ओबामांनी ई-मेलद्वारे दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, की आम्ही आमची सुरक्षा व आमच्या जीवन पद्धतीच्या संरक्षणासाठी एकत्रितपणे उभे आहोत, हे भारतीयांना सांगण्यासाठी आपण २०१०च्या दौऱ्यात सर्वप्रथम मुंबईच्या ताज हॉटेलला भेट दिली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)

चोख सुरक्षा व्यवस्थेमुळे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या दौऱ्यादरम्यान राजधानी दिल्लीऐवजी आता देशाच्या अन्य भागांत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी राज्यांना, विशेषत: जम्मू-काश्मीरला या गंभीर धोक्याबाबत सावध केले आहे. काश्मीरमध्ये २००० साली तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या भारत दौऱ्याच्या पूर्वसंध्येला छत्तीसिंहपुरा येथे दहशतवादी हल्ला झाला होता.
त्यात ३६ जण ठार झाले होते. अशा प्रकारचा हल्ला या वेळीही होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Racked up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.