पोलिस ठाण्यासमोर राडा
By admin | Published: January 31, 2017 02:06 AM2017-01-31T02:06:38+5:302017-01-31T02:06:38+5:30
कोल्हापूर : पोलिस ठाण्यात वाद मिटविण्यासाठी आलेल्या विचारेमाळ येथील निळा रक्षक बॉईजच्या दोन गटांत शाहूपुरी पोलिस ठाण्यासमोर जोरदार राडा झाला. पोलिसांनी सौम्य लाठी चार्ज करून सर्वांना पिटाळून लावले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आठजणांना ताब्यात घेतले.
Next
क ल्हापूर : पोलिस ठाण्यात वाद मिटविण्यासाठी आलेल्या विचारेमाळ येथील निळा रक्षक बॉईजच्या दोन गटांत शाहूपुरी पोलिस ठाण्यासमोर जोरदार राडा झाला. पोलिसांनी सौम्य लाठी चार्ज करून सर्वांना पिटाळून लावले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आठजणांना ताब्यात घेतले. चोरट्यांनी बंगला फोडलाकोल्हापूर : शासकीय विश्रामगृहाच्या पिछाडीस असलेल्या त्रिवेणी रेसिडेन्सीमध्ये निवृत्त प्राध्यापकाचा बंगला फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. वाळू तस्करीचे १८ ट्रक पकडलेकवठेमहांकाळ (जि. सांगली) : मिरज-पंढरपूर रस्त्यावर वाळू तस्करी करणार्या १८ ट्रकवर कारवाई करून कवठेमहांकाळच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी शनिवारी वाळू तस्करांना मोठा झटका दिला. सांगोला हद्दीत वाळूचे ट्रक लपविण्यात आले होते. यामध्ये २४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विवाहितेची आत्महत्यादेशिंग (जि. सांगली) : अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. शीतल दत्ताजी खंडागळे (वय २६) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. शॉर्टसर्किटने आग लागून घर खाकपाटण (जि. सातारा) : साखरी (ता़ पाटण) येथे आग लागून राहते घर खाक झाले. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा ग्रामस्थांचा कयास आहे़ आगीत संसारोपयोगी साहित्यासह दागिने, कपडे, भांडी असे मिळून आठ लाख पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे.पर्स पळविणार्या दोघांना अटकसातारा : दुचाकीवरील महिलेची पर्स हिसकावून चोरून नेणार्या दोघांना सातारा तालुका पोलिसांनी शिताफीने पकडले. आत्तापर्यंत पाच महिलांची पर्स लांबविल्याची कबुली त्यांनी दिली आहे. शंकर श्रीरंग शिंदे (वय २२), प्रकाश सुदाम घाडगे (२८, दोघेही रा. भोंदवडे, ता. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हत्तींकडून शेतीचे नुकसानदोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) : गेले पंधरा दिवस दडी मारलेल्या हत्तींनी पुन्हा घाटीवडे येथे येऊन येथील नारायण गवस यांच्या शेती बागायतीत घुसून मोठ्या प्रमाणात हजारो रुपयांचे नुकसान केले आहे. तिलारी नदीपात्रात मासेमारीला जोर दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) : तालुक्यातील तिलारी नदीपात्रात जाळ्याच्या साहाय्याने मासेमारी केली जात आहे. हे मासे विक्रीसाठी दोडामार्ग बाजारपेठेत येत असून, ग्राहकांचंी खरेदीसाठी झुंबड उडत आहे. बंदूकप्रकरणी चार अटकेत चिपळूण (जि. रत्नागिरी) : भोम-गणेशखिंड मार्गावर विनापरवाना बंदूक वापरल्याप्रकरणी तिघांना व बंदूक बनविणार्या एकाला अटक केली. मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय चिपळूण (जि. रत्नागिरी) : रस्ता बंद केल्यामुळे घाणेकरवाडी व गोपाळवाडी ग्रामस्थांच्या दळणवळणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत कारवाईबाबत कोणतीही हालचाल झाली नसल्याने घाणेकरवाडी, गोपाळवाडी ग्रामस्थांनी दि. २१ फेब्रुवारी रोजी होणार्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.