...आता सीमेपलीकडून आलेल्या क्षेपणास्त्रांचं समजणार रडार

By admin | Published: February 12, 2017 05:54 PM2017-02-12T17:54:33+5:302017-02-12T17:58:58+5:30

सीमेपलीकडून आलेलं कोणतंही क्षेपणास्त्र, ड्रोन आणि लढाऊ विमानांची तात्काळ माहिती मिळणार आहे.

... radar will now understand the ballistic missiles | ...आता सीमेपलीकडून आलेल्या क्षेपणास्त्रांचं समजणार रडार

...आता सीमेपलीकडून आलेल्या क्षेपणास्त्रांचं समजणार रडार

Next

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 12 - भारतीय हवाई दल दिवसेंदिवस कात टाकत आहे. पाकिस्तान आणि चीन सारख्या शत्रू राष्ट्रांचा सामना करण्यासाठी भारतीय हवाई दलानं कंबर कसली आहे. भारतीय हवाई दल शत्रूराष्ट्रांकडून होणा-या हल्ल्याच्या आधीपासून करडी नजर ठेवणार असून, सीमेपलीकडून आलेलं कोणतंही क्षेपणास्त्र, ड्रोन आणि लढाऊ विमानांची तात्काळ माहिती मिळणार आहे.

भारतीय हवाई दलाच्या सेवेत पहिल्यांदाच स्वदेशी बनावटीच्या हवामान वैमानिक पूर्वसूचना आणि कंट्रोल सिस्टीम(AEW&C)चा समावेश होणार आहे. बंगळुरूत होणा-या एयरो इंडिया 2017मध्ये याची झलक पाहायला मिळणार आहे. डीआरडीओचे चेअरमन एस. क्रिस्टोफर यांनी शनिवारी हवामान वैमानिक पूर्वसूचना आणि कंट्रोल सिस्टीम(AEW&C)चा हवाई दलात समावेश करणार असल्याची माहिती दिली. 


या प्रोजेक्टवर 2400 कोटी खर्च येणार असून, पहिला एअरक्राफ्ट 14 फेब्रुवारीला सेवेत येणार आहे. काही महिन्यानंतर दुसराही एअरक्राफ्ट हवाई दलाला देण्यात येणार आहे. सामरिक सामर्थ्यात भारत पाकिस्तान आणि चीनच्या तुलनेत मागे असल्याचं समोर आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर स्वदेशी हवामान वैमानिक पूर्वसूचना आणि कंट्रोल सिस्टीम बनवण्यात आलं आहे. सध्या भारताकडे फक्त तीन फॉल्कन एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम आहे. 

Web Title: ... radar will now understand the ballistic missiles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.