शेतकऱ्याच्या लेकीची नेत्रदिपक भरारी, क्रॅक केली UPSC; २२ वर्षांपूर्वी वडिलांनी मुलांसाठी सोडलेलं घर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 04:41 PM2024-07-16T16:41:27+5:302024-07-16T16:53:14+5:30

अनिल अवस्थी यांनी आपल्या चार मुलांच्या भविष्यासाठी हे मोठं पाऊल उचललं. अनिल यांची धाकटी मुलगी राधा अवस्थी हिने पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा २०२३ उत्तीर्ण केली.

Radha Awasthi daughter farmer awasthi cracked upsc first attempt | शेतकऱ्याच्या लेकीची नेत्रदिपक भरारी, क्रॅक केली UPSC; २२ वर्षांपूर्वी वडिलांनी मुलांसाठी सोडलेलं घर

शेतकऱ्याच्या लेकीची नेत्रदिपक भरारी, क्रॅक केली UPSC; २२ वर्षांपूर्वी वडिलांनी मुलांसाठी सोडलेलं घर

कधी कुटुंबाच्या हितासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात तर कधी काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागतं. अशीच एक घटना आता समोर आली आहे. बांदा जिल्ह्यातील शेतकरी अनिल अवस्थी यांच्यासोबत असंच झालं आहे, ज्यांनी २२ वर्षांपूर्वी आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी गाव सोडून लखनौला येण्याचा मोठा निर्णय घेतला होता.

एका शेतकऱ्यासाठी शहरात जाऊन मुलांना वाढवणं सोपं नव्हतं, पण तरीही अनिल अवस्थी यांनी आपल्या चार मुलांच्या भविष्यासाठी हे मोठं पाऊल उचललं. अनिल यांची धाकटी मुलगी राधा अवस्थी हिने पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा २०२३ उत्तीर्ण केली. राधाचं यश हेच सिद्ध करतं की तुम्ही मेहनतीनं काम केलं तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीत यशस्वी व्हाल.

लखनौमधून बीएसएसी केल्यानंतर राधा केंद्रीय विद्यालय सागरमधून एम.टेक शिकत होती आणि UPSC ची तयारीही करू लागली होती, ती रोज सात तास अभ्यास करत होती. राधा म्हणाली की, कोणतेही काम अवघड नसतं, फक्त तुमचं ध्येय ठरवायचं असतं. मुली आज सर्व काही करू शकतात. तिने आपल्या यशाचं संपूर्ण श्रेय कठोर परिश्रमाला आणि पालकांना दिलं ज्यांनी तिला नेहमीच प्रोत्साहन दिलं. 

राधाच्या यशानंतर वडील अनिल अवस्थी यांना आनंद झाला. मी माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी गाव सोडलं होतं आणि आज माझ्या मुलांनी माझा संकल्प पूर्ण केला आहे, त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. आज अवस्थी कुटुंब हे लोकांसाठी एक उदाहरण आहे. राधा आज लोकांसाठी प्रेरणा बनली आहे असं वडिलांनी म्हटलं आहे. 
 

Web Title: Radha Awasthi daughter farmer awasthi cracked upsc first attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.