राधा मुकुंद नाईक वक्तृत्व स्पर्धा
By admin | Published: August 14, 2015 12:05 AM2015-08-14T00:05:10+5:302015-08-14T00:05:10+5:30
मडगाव: कोंकणी भाषा मंडळ आयोजित अखिल गोवा उच्च माध्यमिक स्तरावरील राधा मुकुंद नाईक स्मृती वक्तृत्व स्पर्धा 21 ऑगस्ट रोजी मडगावच्या कोंकणी भवनात होणार आहे. या स्पर्धेत गोव्यातील कुठल्याही उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन स्पर्धत सहभागी होऊ शकतात. प्रत्येक विद्यार्थ्यांला खालील दिलेल्या तीनपैकी एका विषयांवर 7 ते 8 मिनिटे बोलण्याची संधी मिळणार आहे.
Next
म गाव: कोंकणी भाषा मंडळ आयोजित अखिल गोवा उच्च माध्यमिक स्तरावरील राधा मुकुंद नाईक स्मृती वक्तृत्व स्पर्धा 21 ऑगस्ट रोजी मडगावच्या कोंकणी भवनात होणार आहे. या स्पर्धेत गोव्यातील कुठल्याही उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन स्पर्धत सहभागी होऊ शकतात. प्रत्येक विद्यार्थ्यांला खालील दिलेल्या तीनपैकी एका विषयांवर 7 ते 8 मिनिटे बोलण्याची संधी मिळणार आहे.या स्पर्धेसाठी विषय असे आहेत : 1) गोंयच्या हिताखातीर? प्रादेशिक काय राष्ट्रीय पक्ष, 2) सोशल मिडिया? श्वास काय त्रास, 3) आयचो तरनाटो आत्मकेंद्रीत झाला?. या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना एक हजार, 750 व 500 अशी बक्षिसे दिली जाणार. एकापेक्षा जास्त विजेते असल्यास बक्षिसांची रक्कम विभागून दिली जाणार असे कळविण्यात आले आहे. स्पर्धकांना मडगावच्या कदंबा बस स्थानकाकडून कोंकणी भवनकडे आणण्यासाठी बसची व्यवस्था केली असून ज्या कुणाला या सोयीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी सकाळी 9 वा. बसस्थानकावर हजर रहावे असे कळविण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संयोजक अनंत अग्नी यांच्याशी संपर्क साधण्यास कळविल आहे. (प्रतिनिधी)