मुख्यमंत्री गुंडांना पाठिशी घालतात राधाकृष्ण विखे : कायदा- सुव्यवस्था राखण्यात अपयश

By admin | Published: October 3, 2015 12:20 AM2015-10-03T00:20:32+5:302015-10-03T00:20:32+5:30

लोणी (अहमदनगर) : नागपूर शहरासह राज्यातील कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, सरकारच्या बोटचेप्या भूमिकेमुळे सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे़ गृहमंत्री तथा मुख्यमंत्री पोलीस अधिकार्‍यांना पाठिशी घालून गुंडांना संरक्षण देत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली़

Radhakrishna Dikha: The failure to maintain law and order | मुख्यमंत्री गुंडांना पाठिशी घालतात राधाकृष्ण विखे : कायदा- सुव्यवस्था राखण्यात अपयश

मुख्यमंत्री गुंडांना पाठिशी घालतात राधाकृष्ण विखे : कायदा- सुव्यवस्था राखण्यात अपयश

Next
णी (अहमदनगर) : नागपूर शहरासह राज्यातील कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, सरकारच्या बोटचेप्या भूमिकेमुळे सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे़ गृहमंत्री तथा मुख्यमंत्री पोलीस अधिकार्‍यांना पाठिशी घालून गुंडांना संरक्षण देत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली़
लोणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विखे म्हणाले, भाजयुमोचा अध्यक्ष सुमीत ठाकूर याच्या दहशतीला कंटाळून नागपूर सोडणार्‍या प्रा़ मल्हारी म्हस्के यांना मुख्यमंत्र्यांनी भेटण्याचे व चौकशी करण्याचे औदार्यही दाखविले नाही़ नागपूरचे तत्कालीन पोलीस आयुक्त पाठक यांच्या कार्यकाळातच गुन्हेगारीने डोके वर काढले़ मुख्यमंत्र्यांनी त्याच पाठक यांना पुणे पोलीस आयुक्त पदावर नियुक्त करणे म्हणजे अकार्यक्षम अधिकार्‍यास पदोन्नती दिली आहे़ त्यामुळे गुन्हेगार मोकाट सुटले असून, कायदा- सुव्यवस्था राखण्यात मुख्यमंत्र्यांना अपयश आल्याची टीका विखे यांनी केली आहे़
जलयुक्तचा बोजवारा
जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेल्या बंधार्‍यांपैकी अनेक बंधारे वाहून गेले आहेत़ राज्यातील दुष्काळ हटला नाही. मात्र, या योजनेचा बोजवारा उडाला आहे़ सरकार दुष्काळ हटविण्यासाठी काम करीत नाही तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्कही माफ करीत नाही़ मात्र, करवाढीतून उभा केलेला ४० कोटी रुपयांचा निधी सरकारने जाहिरातींसाठी राखीव ठेवल्याचे सांगत विखे यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली़

Web Title: Radhakrishna Dikha: The failure to maintain law and order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.