प्रेरणादायी! शाळेत मित्रांनी थट्टा केली, 7 वेळा जॉब इंटरव्ह्यूमध्ये फेल ठरली पण 33 वर्षी CEO झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 05:17 PM2023-01-26T17:17:07+5:302023-01-26T17:23:43+5:30
33 व्या वर्षी प्रतिष्ठित कंपनीत सर्वोच्च स्थान मिळवले. राधिका यांचा प्रवास सोपा नव्हता. अनेक अडचणींचा त्यांनी सामना केला.
भारताच्या यंग सीईओ (सीईओ) मध्ये समाविष्ट असलेल्या एडलवाइज एमएफच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राधिका गुप्ता ( CEO Radhika Gupta) यांचे जीवन प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. मानेचा आणि डोळ्यांचा त्रास असलेल्या राधिका यांना तब्बल सात कंपन्यांनी जॉब इंटरव्ह्यूमध्ये फेल केलं. पण याच तरुणीने वयाच्या 33 व्या वर्षी प्रतिष्ठित कंपनीत सर्वोच्च स्थान मिळवले. राधिका यांचा प्रवास सोपा नव्हता. अनेक अडचणींचा त्यांनी सामना केला.
राधिका गुप्ता यांची आई शिक्षिका होती. राधिका यांचे शिक्षण भारत, पाकिस्तान, अमेरिका आणि नायजेरियामध्ये झाले. राधिका यांची मान लहानपणापासूनच वाकडी आहे आणि त्यांना डोळ्यांचा देखील त्रास आहे. त्यांच्या शारीरिक कमतरतेमुळे आणि बोलण्याच्या भारतीय उच्चारामुळे मुले शाळेत त्यांची खूप थट्टा करायचे. ते राधिका यांना अप्पू नावाने हाक मारायचे. हे सिम्पसनमधील एका कॅरेक्टरचं नाव आहे.
राधिका यांनी एकदा ह्युमन ऑफ बॉम्बे नावाच्या एका संस्थेला सांगितले की, माझी नेहमी माझ्या आईशी तुलना होते. ती माझ्याच शाळेत शिकवायची. ती एक अतिशय सुंदर आणि आकर्षक स्त्री आहे. लोक नेहमी माझी तुलना माझ्या आईशी करतात आणि म्हणायचे की मी तिच्या तुलनेत खूप कुरूप आहे. यामुळे माझा आत्मविश्वास कमी व्हायचा.
कॉलेज संपल्यावर मिळाली नाही नोकरी
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर वयाच्या 22व्या वर्षी राधिका यांनी नोकरी शोधाय़ला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी 7 कंपन्यांमध्ये नोकरीसाठी मुलाखती दिल्या. नशीब इतकं खराब होतं की ती एकही इंटरव्ह्यू पास झाल्या नाहीत आणि नोकरीही मिळाली नाही. बाराव्या मुलाखतीत नापास झाल्यानंतर त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार केला. घराच्या खिडकीतून उडी मारणार होत्या तेव्हा मित्रांनी घटनास्थळी पोहचून वाचवले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"