कुमारस्वामींची दुसरी पत्नी त्यांच्यापेक्षा तिप्पट श्रीमंत, इतकी आहे संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 03:38 PM2018-05-21T15:38:40+5:302018-05-21T15:44:38+5:30

तब्बल दहा वर्षं कुमारस्वामी दोन्ही घरांना समान वेळ देत होते.

radhika kumaraswamy has more property than karnatak cm kumaraswamy | कुमारस्वामींची दुसरी पत्नी त्यांच्यापेक्षा तिप्पट श्रीमंत, इतकी आहे संपत्ती

कुमारस्वामींची दुसरी पत्नी त्यांच्यापेक्षा तिप्पट श्रीमंत, इतकी आहे संपत्ती

googlenewsNext

मुंबई- कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदासाठी शपथ घेणारे कुमारस्वामी यांच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट ज्याप्रमाणे रंजक आहे त्याच प्रमाणे त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टीही तितक्याच रंजक आहेत. 
कुमारस्वामी यांनी २००६ मध्ये राधिकासोबत लग्न केलं होतं. तब्बल दहा वर्षं कुमारस्वामी दोन्ही घरांना समान वेळ देत होते. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून ते आपल्या पहिल्या पत्नीसोबत राहत असल्याचं निकटवर्तीयांनी सांगितलं. कुमारस्वामींचं पहिलं लग्न १९८६ मध्ये झालं होतं. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव अनिता आहे. या लग्नाच्या वेळी राधिकाचा नुकताच जन्म झाला होता. आता राधिकाच्या संपत्तीबद्दल सगळ्यांनाच धक्का बसेल अशी माहिती समोर आली आहे. 

कुमारस्वामी यांची दुसरी पत्नी राधिका त्यांच्यापेक्षा तिप्पट श्रीमंत आहे. राधिकाची एकूण संपत्ती 124 कोटी रुपये आहे तर कुमारस्वामी यांची एकूण संपत्ती 44 कोटी रुपये आहे. राधिका लग्नानंतरही अभिनय क्षेत्रात होती. अभिनयबरोबर तीने सिनेमांची निर्मितीही केली. तिच्याकडे कोट्यवधी रुपयांच्या गाड्याही आहेत. यामध्ये 8 कोटी रुपयांची लॅम्बोरगिनी, 2.5 कोटी रुपयांची पोर्शे, 3 कोटी रुपयांची रेंज रोव्हर आणि 45 लाख रुपयांच्या हॅम्मर गाडीचा समावेश आहे. 

२००२ मध्ये राधिकाने कन्नड सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्याच वर्षी तिनं रतन कुमारसोबत पळून जाऊन लग्नही केलं होतं. पण लग्नानंतर काही दिवसांतच रतनचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं होतं. हा राधिकासाठी मोठा धक्का होता. पण नंतर, २०१० मध्ये एका मुलाखतीत आपलं नाव राधिका कुमारस्वामी असं सागून तिनं खळबळ उडवून दिली होती. 

कुमारस्वामी आणि राधिका यांच्या वयात २७ वर्षांचं अंतर आहे. त्या दोघांना शमिका नावाची मुलगीही आहे. मात्र, निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात कुमारस्वामींनी आपल्या पहिल्या पत्नीचंच नाव लिहिलं आहे. 

२००७ मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री असताना कुमारस्वामींनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. ते सुट्टीत राधिकासोबत परदेशी फिरायला गेले होते.  २०१३ मध्ये स्वतःची निर्मिती असलेल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी राधिकाने कुमारस्वामींचा फोटो वापरला होता.
हिंदू विवाह कायद्यानुसार दोन लग्न करणं गुन्हा आहे. परंतु, कुमारस्वामी-राधिकाच्या लग्नाचा कुठलाही अधिकृत पुरावा नसल्याचं सांगत उच्च न्यायालयाने या संदर्भातील याचिका फेटाळून लावली होती.

Web Title: radhika kumaraswamy has more property than karnatak cm kumaraswamy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.