‘दिल्ली विमानतळावरील किरणोत्सर्ग धोक्याचा नाही’
By admin | Published: October 10, 2016 04:31 AM2016-10-10T04:31:00+5:302016-10-10T04:31:00+5:30
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कार्गो टर्मिनलमधून झालेल्या किरकोळ किरणोत्सर्गापासून काहीही धोका नाही, असे सरकारी अधिकाऱ्याने
नवी दिल्ली : इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कार्गो टर्मिनलमधून झालेल्या किरकोळ किरणोत्सर्गापासून काहीही धोका नाही, असे सरकारी अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. शनिवारी रात्री कर्करोगावरील उपचारांसाठीच्या औषधांतून हा किरणोत्सर्ग झाला.
ही औषधे एअर फ्रान्सच्या विमानाने आली होती. झालेला किरणोत्सर्ग हा त्याच्या विहित मर्यादेत होता, असे भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या (एनडीआरएफ) अधिकाऱ्याने सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार एअर फ्रान्सच्या विमानाने नेहमीप्रमाणे कर्करोगावरील उपचारांच्या औषधांची १६ पॅकेट्स धिती बायोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसाठी रात्री १०.३० वाजता आली. ती सीआयएसबीआयबो इंटरनॅशनल यांनी पाठविली होती. त्यातील दहा पॅकेट्सची हाताळणी जमिनीवर मालाची हाताळणी करणाऱ्या एजन्सी केली. बीएआरसी व एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी रात्री १.५५ वाजताच झालेला किरणोत्सर्ग हा मर्यादेत असल्यामुळे कोणताही धोका होण्याची अपेक्षित नाही, असे स्पष्ट केले होते. सगळ््या विमानांचे उड्डाण कोणत्याही अडथळ््याशिवाय होत असल्याचे दिल्ली विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)