राफेल विमान कराराशी एचएएलचा संबंध नाही, अध्यक्षांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 04:31 AM2018-11-08T04:31:58+5:302018-11-08T04:32:42+5:30

रोफल विमानांची किंमत आणि त्यात हिंदुस्थान एअरोनॉटिक्स (एचएएल) या सरकारी कंपनीऐवजी अनिल अंबानी यांच्या कंपनीला भागीदार करून घेतल्याचा वाद सुरू असतानाच, एचएएल आॅफसेट बिझनेसमध्ये नसल्याचे कंपनीचे अध्यक्ष आर. माधवन यांनी स्पष्ट केले आहे.

The Rafael aircraft carrier does not belong to HAL, the president's claim | राफेल विमान कराराशी एचएएलचा संबंध नाही, अध्यक्षांचा दावा

राफेल विमान कराराशी एचएएलचा संबंध नाही, अध्यक्षांचा दावा

googlenewsNext

बंगळुरू - रोफल विमानांची किंमत आणि त्यात हिंदुस्थान एअरोनॉटिक्स (एचएएल) या सरकारी कंपनीऐवजी अनिल अंबानी यांच्या कंपनीला भागीदार करून घेतल्याचा वाद सुरू असतानाच, एचएएल आॅफसेट बिझनेसमध्ये नसल्याचे कंपनीचे अध्यक्ष आर. माधवन यांनी स्पष्ट केले आहे.
ते म्हणाले की, राफेल करारानुसार एचएएल ३0 हजार कोटींच्या आॅफसेट करारामध्ये सहभागी नव्हती. त्यामुळे तिला सहभागी करून घेण्यात आले नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. राफेलच्या वादात हिंदुस्थान एअरोनॉटिक्सचा काहीही संबंध नाही.
या वादात कंपनीने वा कंपनीचे अधिकारी वा कर्मचाऱ्यांनी पडू नये आणि त्या वादाकडे लक्षही देऊ नये, असे आवाहनही आर. माधवन यांनी केले आहे. तसेच या वादात कंपनीतील कामगार संघटनांनी आपली बाजू स्पष्टपणे मांडली आहे. संघटनांनी या वादाशी आपला संबंध नसल्याचे नमूद केले आहे, याचा उल्लेखही त्यांनी केला. (वृत्तसंस्था)

‘क्षमतेवर शंका नको’

माधवन म्हणाले की, हिंदुस्थान एअरोनॉटिक्स स्वत:च लढाऊ विमाने तयार करीत आली आहे. तसेच भारतीय हवाई दलाच्या ७५ टक्के विमाानंची देखभाल व दुरुस्ती आमची कंपनीच करते. त्यामुळे आमच्या योग्यता वा क्षमतेविषयी कुणी शंका उपस्थित करु नये. मात्र आम्ही आॅफसेट व्यवसायात नसल्याने राफेल विमान कराराशी आमचा अजिबात संबंध नाही.

Web Title: The Rafael aircraft carrier does not belong to HAL, the president's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.