भारत - फ्रान्समध्ये ३६ लढाऊ विमानांसाठी राफेल करार
By admin | Published: September 23, 2016 04:29 PM2016-09-23T16:29:14+5:302016-09-23T16:29:14+5:30
भारत आणि फ्रान्समध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत असलेला राफेल करार अखेर झाला आहे. शुक्रवारी दिल्लीत भारत आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांनी राफेल विमानासाठी करार केला
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - भारत आणि फ्रान्समध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत असलेला राफेल करार अखेर झाला आहे. शुक्रवारी दिल्लीत भारत आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांनी राफेल विमानासाठी करार केला. 7.8 बिलियन यूरोमध्ये (भारतीय चलनानुसार 59 हजार कोटी रुपये) हा करार करण्यात आला आहे. या कारारामुळे आगामी पाच वर्षात 36 राफेल विमान भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या करारामुळे भारतीय हवाई दलाची ताकद अजून वाढली असून यामुळे चीनवर वचक ठेवण्यास फायदा मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्स दौ-यावेळी 36 लढाऊ विमाने विकत घेण्याची घोषणा केल्यानंतर 16 महिन्यानंतर हा करार झाला आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि फ्रान्सचे संरक्षणमंत्री ड्रायन यांनी राफेल करारावर सह्या केल्या.
#WATCH Deal for 36 #Rafale fighter jets between India and France signed; deal is worth 7.8 billion euros. pic.twitter.com/3SeWCcRRQe
— ANI (@ANI_news) September 23, 2016
गेल्या 20 वर्षीतील हा पहिलाच लढाऊ विमानांचा करार असल्याचं बोललं जात आहे. युपीए सरकार सत्तेत असताना जो राफेल करार झाला होता त्याच्याशी तुलना करता या करारात 75 कोटी युरोंची (भारतीय चलनानुसार 5601 कोटी) बचत होत आहे. मोदी सरकारने युपीएचा करार रद्द केला होता.
This is the first such deal for procurement of fighter jets signed in 20 years, which is unique in itself: Defence Minister Manohar Parrikar pic.twitter.com/z0ix8xtPNh
— ANI (@ANI_news) September 23, 2016
या विमानांमुळे हवाई दलाला भारताच्या हद्दीत राहुनच पाकिस्तानवर निशाणा साधणे शक्य होऊ शकेल. या विमानात मिटीअर आणि मायका या दोन मिसाईल प्रणाली असतील. पाकिस्तानकडे सध्या असलेल्या प्रणालींपेक्षा ही प्रणाली जास्त संहारक आहे.