पाकिस्तान, चीनवर भारताचा राफेल वचक

By admin | Published: September 24, 2016 05:48 AM2016-09-24T05:48:26+5:302016-09-24T05:48:26+5:30

भारत आणि फ्रान्समध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत असलेला राफेल विमानांचा करार अखेर झाला

Rafael Pacers of Pakistan, China on China | पाकिस्तान, चीनवर भारताचा राफेल वचक

पाकिस्तान, चीनवर भारताचा राफेल वचक

Next


नवी दिल्ली : भारत आणि फ्रान्समध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत असलेला राफेल विमानांचा करार अखेर झाला आहे. ही राफेल विमाने भारतात दाखल झाल्याने सारख्या कुरबोरी काढणाऱ्या पाकिस्तान आणि चीनवर भारताला आणखी वचक ठेवता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या फ्रान्स दौऱ्यात त्या देशाकडून ३६ राफेल विमाने घेण्याची घोषणा केली होती. त्याबाबत गेल्याच आठवड्यात दोन्ही देशांमध्ये शिक्कामोर्तब झाले आणि पंतप्रधानांच्या घोषणेनंतर १६ महिन्यांत करारावर सह्या झाल्या आहेत. गेल्या २0 वर्षांतील हा सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय करार आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार असताना राफेलशी करण्यात आलेला करार मोदी सरकारने रद्द केला होता. यूपीएच्या काळातील कराराच्या तुलनेत नव्या करारामुळे भारताचे ७५ कोटी युरो म्हणजेच भारतीय चलनातील ५६0१ कोटी रुपये वाचणार आहेत, असे सांगण्यात आले.
>36लढाऊ विमानांसाठी फ्रान्ससोबत करार
>59,000 कोटींचा करार
या करारामुळे येत्या तीन वर्षांनी भारतीय हवाई दलामध्ये राफेल विमाने दाखल होण्यास सुरुवात होईल आणि त्यानंतरच्या दोन ते तीन वर्षांत सर्व ३६ विमाने भारताकडे आलेली असतील. या विमानांमुळे भारतीय हवाई दलाची ताकद अजून वाढणार असून, त्यामुळे चीनवर वचक ठेवण्यास उपयोग होईल, असे संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
>काय होईल या विमानांमुळे?
या विमानांमुळे हवाई दलाला भारताच्या हद्दीबाहेर न जाताही पाकिस्तानवर निशाणा साधणे शक्य होऊ शकेल.
या विमानात मिटीअर आणि मायका या दोन क्षेपणास्त्र प्रणाली असतील.
पाकिस्तानकडे सध्या असलेल्या प्रणालींपेक्षा
राफेल विमानांतील प्रणाली
अधिक संहारक असल्याची
माहिती देण्यात आली.
या विमानांची हवेतील क्षेपणास्त्र क्षमता १५0 किलोमीटर असेल.

Web Title: Rafael Pacers of Pakistan, China on China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.