Rafale in india : भारतीय आकाशात राफेलचं आगमन, संरक्षणमंत्र्यांनी शेअर केला 'अफलातून व्हिडिओ'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 02:36 PM2020-07-29T14:36:49+5:302020-07-29T15:05:03+5:30
भारतात अंबाला विमानतळावर काही वेळातच राफेल विमानं दाखल होणार आहेत. या राफेल विमानांमुळे भारताच्या हवाई दलाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
नवी दिल्ली - चीनच्या सीमेवरील वाढता तणाव लक्षात घेऊन भारतीय दलाने केलेली खास विनंती मान्य करून फ्रान्सने राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीत 5 विमानांची पाठवणी केली आहे. बहुप्रतिक्षीत असलेल्या या राफेल विमानांनी भारताच्या हद्दीत प्रवेश केला आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राफेल विमानांच्या गगनभरारीचा अफलातून व्हिडिओ शेअर केला आहे.
भारतात अंबाला विमानतळावर काही वेळातच राफेल विमानं दाखल होणार आहेत. फ्रान्सकडून पहिल्या टप्प्यात 5 राफेल विमानं भारताला देण्यात आली असून या 5 राफेलसह 2 SU30 MKIs विमान आहेत. त्यामुळे, एकूण 7 लढाऊ विमानांच काही वेळातचं विमानतळावर आगमन होईल. मात्र, हा व्हिडिओ पाहून शेअर करण्याचा मोह आवरणार नाही. राफेल विमानांमुळे भारताच्या हवाई दलाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. विशेष म्हणजे भारतात येणाऱ्या राफेल लढाऊ विमानांकडे मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येणार आहेत. अंबाला एअरफोर्स स्टेशनवर भारतीय हवाई दलाची ही नवीन राफेल लढाऊ विमानं तैनात केली जाणार आहेत. राफेलसारख्या प्राणघातक आणि अत्याधुनिक लढाऊ विमानांना तैनात करण्यासाठी केवळ अंबालाच का निवडले गेले. कारण अंबाला अशी जागा आहे जिथून आपल्या देशातील दोन्ही शत्रूंना काही मिनिटांत धुळीस मिळवता येऊ शकते.
राजनाथसिंह यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
The five Rafales escorted by 02 SU30 MKIs as they enter the Indian air space.@IAF_MCCpic.twitter.com/djpt16OqVd
— रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) July 29, 2020
दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी २ जून रोजी फ्रान्सच्या संरक्षणमंत्री प्लॉरेन्स पार्ले यांच्याशी टेलिफोनवरून चर्चा केली तेव्हा कोरोनामुळे ‘लॉकडाऊन’ सुरु असले तरी भारताला राफेल विमानांची पहिली खेप ठरल्या तारखेला सुपूर्द करण्याची हमी फ्रान्सकडून देण्यात आली. करारानुसार भारत ५९ हजार रुपये कर्च करून एकूण ३६ राफेल विमाने खरेदी करण्यात येत आहेत. अत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी सज्ज अशा राफेल लढाऊ विमानांनी हवाईदलाच्या मारकक्षमतेस मोठे बळ तर मिळेलच. शिवाय सीमेवर डोळे वटारणाऱ्या चीनलाही त्यामुळे जरब बसेल, असे जाणकारांना वाटते. ३६ पैकी ३० विमाने प्रत्यक्ष युद्दसज्जतेसाठी व चार प्रशिक्षणासाठी वापरली जातील. या विमानांची एक स्वाड्रन अंबाला येथे तर दुसरी प. बंगालमध्ये हाशिमारा येथे तैनात केली जाईल.