Rafale Deal: राफेल प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार? सुप्रीम कोर्टाने सुनावला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 01:34 PM2022-08-29T13:34:52+5:302022-08-29T13:36:19+5:30
Rafale Deal : फ्रान्समधील डसॉल्ट एव्हिएशनकडून भारतीय मध्यस्थांना लाच देण्यात आल्याचा दावा फ्रान्समधील काही न्यूज पोर्टल्सनी केला होता, त्या रिपोर्टला आधार बनवून नव्याने चौकशी करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती.
नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने राफेल प्रकरणात पुन्हा एकदा तपास करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. फ्रान्समधील डसॉल्ट एव्हिएशनकडून भारतीय मध्यस्थांना लाच देण्यात आल्याचा दावा फ्रान्समधील काही न्यूज पोर्टल्सनी केला होता, त्या रिपोर्टला आधार बनवून नव्याने चौकशी करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. दसॉल्ट एव्हिएशनने भारतीय मध्यस्थांना मोठ्या प्रमाणावर लाच दिल्याचा आरोप या वृत्तांमध्ये करण्यात आला होता.
सरन्यायाधीश यू. यू. लळीत यांच्या नेतृत्वाखालील पीठाने अधिवक्ता एमएल शर्मा यांच्याकडून दाखल जनहित याचिकेला फेटाळून लावताना सांगितले की, न्यायालयाकडून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचं काही कारण दिसत नाही. याबाबत आपली बाजू मांडताना अधिवक्ता शर्मा यांनी कोर्टाला विनवणी करत सांगितले की, एक दिवस असा येईल की, जेव्हा प्रत्येक व्यक्ती स्वत:ला असहाय्य असल्याचे वाटून घेईल. त्यांनी सांगितले की, भ्रष्टाचाराबाबत प्रश्न उपस्थित करण्यासाठी पुढे आलेला नाही. त्यावर प्रतिक्रिया देताना सरन्यायाधीशांनी सांगितले की, आम्ही आधीच आदेश दिलेला आहे.
कोर्टातील चर्चेनंतर बीएल शर्मा यांनी याचिका परत घेण्याची मागणी केली. त्वार खंडपीठाने आदेश बदलत याचिका मागे घेण्यास परवानगी दिली. शर्मा हे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी सांगितले की, तुम्ही स्वतंत्र आहात, तुमच्यावर कुठलंही बंधन नाही आहे.