Rafale Deal Contoversy: पवारांनी मोदींना क्लीन चिट दिली नाही; राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 08:51 AM2018-09-28T08:51:08+5:302018-09-28T08:51:40+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल प्रकरणाबाबत मोदींची कथित स्वरूपात पाठराखण करण्याचा प्रयत्न समोर आला असतानाच राष्ट्रवादी पक्षानं पवारांच्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिलं आहे.
नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल प्रकरणाबाबत मोदींची कथित स्वरूपात पाठराखण करण्याचा प्रयत्न समोर आला असतानाच राष्ट्रवादी पक्षानं पवारांच्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच शरद पवारांनीराफेल करारावरून पंतप्रधान मोदींना क्लीन चिट दिली नसल्याचंही राष्ट्रवादीनं सांगितलं आहे.
विशेष म्हणजे काल पवारांनी मोदींच्या हेतूवर जनतेला संशय नसल्याचं सांगितल होतं आणि आता पक्षानं ही वेगळी भूमिका मांडली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या प्रकरणावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारनं लढाऊ विमानं असलेल्या राफेलच्या खरेदी किमतीबाबत खुलासा करावा आणि या प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती(जेपीसी)मार्फत चौकशी करावी, अशी मागणी मलिक यांनी केली आहे. तसेच मीडियानं पवारांच्या विधानाचा विपर्यास केल्याचंही नवाब मलिक म्हणाले आहेत.
I thank Shri @PawarSpeaks Ji, a former Defence Minister and veteran MP, for placing national interests above party politics and speaking the truth.
— Amit Shah (@AmitShah) September 27, 2018
Dear @RahulGandhi, you would be wiser by believing your own ally and a leader of Pawar Saheb’s stature.
https://t.co/G1FHyeE2aC
तत्पूर्वी शरद पवार एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हणाले होते, राफेलवरून मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे. मात्र मुळात या कराराबाबत योग्य ती माहिती समजावून घेणं आवश्यक आहे. देशाला राफेल विमानांची गरज आहे, राफेल विमान उत्तम आहेत. तरीही विरोधक संसदीय समिती स्थापनेची मागणी करत असतील, तर सरकारने समिती स्थापन करून याची चौकशी करावी. विमानाच्या तांत्रिक बाजू जाहीर केल्यास तो देशाच्या सुरक्षेला धोका ठरेल. त्यामुळे शत्रूराष्ट्राला विमानाच्या तीव्रतेची जाणीव होईल. या प्रकरणावर सामान्य नागरिकांच्या मनामध्ये मोदींच्या हेतूविषयी शंका नाही, असं म्हणत पवारांनी मोदींची अप्रत्यक्षरीत्या पाठराखण केली होती.