आता डोळे वर करून बघणार नाही शत्रू, 'या' ठिकानाहून फक्त 20 मिनिटांत इस्लामबादवर हल्ले करू शकतं राफेल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 05:48 PM2020-07-29T17:48:14+5:302020-07-29T17:59:32+5:30

हे विमान शत्रूला उद्ध्वस्त करू शकेल, अशा शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे.  राफेलमध्ये अनेक अचूक शस्त्र तैनात केली जाऊ शकतात. 300 किलो मीटरपर्यंत अचूक मारा करणारे स्कल्प क्रूझ क्षेपणास्त्र राफेलला सर्वाधिक घातक बनवते.

rafale fighter jet can attack on Pakistans Islamabad in only 20 minutes | आता डोळे वर करून बघणार नाही शत्रू, 'या' ठिकानाहून फक्त 20 मिनिटांत इस्लामबादवर हल्ले करू शकतं राफेल

आता डोळे वर करून बघणार नाही शत्रू, 'या' ठिकानाहून फक्त 20 मिनिटांत इस्लामबादवर हल्ले करू शकतं राफेल

Next
ठळक मुद्देआता पाकिस्तान आणि चीन सारखे शत्रू देश भारताकडे तिरप्या डोळ्याने बघताना शंभर वेळा विचार करतील.तज्ज्ञांच्या मते राफेल विमान अंबाला येथून केवळ 20 मिनिटांतच पाकिस्तानात घुसून इस्लामाबाद भूईसपाट करू शकते.300 किलो मीटरपर्यंत अचूक मारा करणारे स्कल्प क्रूझ क्षेपणास्त्र राफेलला सर्वाधिक घातक बनवते

नवी दिल्ली - राफेल लढाऊ विमानं आज भारतीय सैन्याच्या ताफ्यात दाखल झाले. फ्रान्समधून आलेली आणि येणारी ही विमानं म्हणजे, साधारणपणे गेल्या दोन दशकांहून अधिक काळानंतर, भारताने संरक्षण क्षेत्रात केलेली सर्वात मोठी खरेदी आहे. ही विमानं देशात आल्याने भारताची युद्ध क्षमता अनेक पटींनी वाढली आहे. यानंतर आता पाकिस्तान आणि चीन सारखे शत्रू देश भारताकडे तिरप्या डोळ्याने बघताना शंभर वेळा विचार करतील.

अंबाला एअरबेस भारतीय हवाई दलाचे महत्वाचे बेस मानले जाते. कारण येथून भारत-पाकिस्तान सीमा केवळ 220 किलो मिटर अंतरावर आहे. तज्ज्ञांच्या मते राफेल विमान अंबाला येथून केवळ 20 मिनिटांतच पाकिस्तानात घुसून इस्लामाबाद भूईसपाट करू शकते. विशेष म्हणजे चीनसोबत वाद सुरू असताना आणि पाकिस्तानातून सातत्याने दहशतवादी कारवाया आणि गोळी बार होत असातनाच राफेल भारताच्या हवाई दलात सामील झाले आहेत. 


शत्रूला उद्ध्वस्त करू शकेल अशा शस्त्रांनी सज्ज -
हे विमान शत्रूला उद्ध्वस्त करू शकेल, अशा शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे.  राफेलमध्ये अनेक अचूक शस्त्र तैनात केली जाऊ शकतात. 300 किलो मीटरपर्यंत अचूक मारा करणारे स्कल्प क्रूझ क्षेपणास्त्र राफेलला सर्वाधिक घातक बनवते. Meteor एअर-टू-एअर मिसाइलचा निशाना कधी चुकत नाही. MICA एअर-टू-एअर क्षेपणास्त्र राफेलला शत्रूपेक्षा वरचढ ठरवते, तर हॅमर क्षेपणास्त्र या विमानाला अजेय ठरवते. पाकिस्तानकडे राफेलशी टक्कर घेऊ शकेल, असे एकही विमान नाही. त्यांच्याकडे F-16 आहे, मात्र एकटे राफेलच दोन एफ-16 च्या बरोबरीचे आहे.

सद्या भारताकडे मिग-29, मिराज, सुखोई-30 ही लढाऊ विमानं आहेत. मात्र, यांच्या तुलनेत राफेल एका वेगळ्या जनरेशनचे विमान आहे. हे विमान आपले लक्ष्य अगदी सहजपणे भेजू शकते. एवढेच नाही, तर शेजारील देशांवर अगदी सहजपणे एअरस्ट्राइक करू शकते.

भारताने 2016 मध्ये फ्रान्ससोबत 36 राफेल विमानांसाठी 60 हजार कोटी रुपयांचा सौदा केला होता. यात 30 फायटर जेट आहेत, तर 6 ट्रेनर विमानं आहेत.

महत्त्वाच्या बातम्या -

सुस्साट वेग, खतरनाक रेंज अन् 70 लाखांचं क्षेपणास्त्र, जाणून घ्या राफेल का आहे 'ब्रह्मास्त्र'

युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...

Coronavirus Vaccine : जगभरात 150 व्हॅक्सीनवर काम सुरू; पण रेसमध्ये टॉपवर फक्त 'या' 4 लसी

CoronaVirus : भारतात 'या' 5 ठिकाणी होणार कोरोना लसीची चाचणी, असे निवडले जातायत लोक

CoronaVirus : चिंपांजीच्या व्हायरसपासून बनलीय ऑक्सफर्डची कोरोना लस; 'ही' आहे खासियत, 'हे' आहेत साईड इफेक्ट्स

धक्कादायक! आता 'या' देशाच्या मागे लागला चीन, थेट 'कब्‍जा' करण्याच्या तयारीत; सुरू केली युद्धाची तयारी

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

Web Title: rafale fighter jet can attack on Pakistans Islamabad in only 20 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.