अटकेचा राग; पोटगी म्हणून दिली ७ पोती भरून नाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 12:48 PM2023-06-21T12:48:42+5:302023-06-21T12:49:06+5:30

ही रक्कम मोजण्यासाठी १० दिवस लागतील, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Rage of Arrest; Gave 7 sacks of coins as alimony | अटकेचा राग; पोटगी म्हणून दिली ७ पोती भरून नाणी

अटकेचा राग; पोटगी म्हणून दिली ७ पोती भरून नाणी

googlenewsNext

राजस्थानमध्ये पत्नीला पोटगी देण्याच्या आदेशाचे पालन करताना आरोपी पतीने तब्बल सात पोती भरून ५५ हजार रुपये किमतीची नाणी आणली. पतीची ही कृती पाहून सर्वांनाच धक्का बसला. 

पत्नी सीमा कुमावत यांचे वकील म्हणाले की, ही माणुसकी नाही. पत्नीचा मानसिक छळ करण्यासाठी हे केले जात आहे. मात्र हे कायदेशीर चलन असल्याचा दावा पतीने केला. ही रक्कम मोजण्यासाठी १० दिवस लागतील, असे न्यायालयाने म्हटले आहे.

या प्रकरणात पती दशरथला ५५ हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते. दशरथने  आदेशाचे पालन केले नाही आणि पोटगीची रक्कमही जमा केली नाही. ही बाब निदर्शनास आल्यानंतर वॉरंट काढण्यात आले होते. त्यानंतर दशरथ याला अटक केली.

याचा वचपा काढण्यासाठी पतीने सात पोत्यांमध्ये आणलेली ५५ हजार रुपयांची नाणी न्यायालयात सादर केली. त्यानंतर आरोपी पतीला जामिनावर सोडण्यात आले.

Web Title: Rage of Arrest; Gave 7 sacks of coins as alimony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.