रघुबर दास सरकारने झारखंडला स्थैर्य दिले -प्रसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 04:52 AM2019-11-28T04:52:16+5:302019-11-28T04:52:47+5:30
झारखंड राज्याची निर्मिती झाल्यानंतर रघुबर दास सरकार येईपर्यंतच्या काळातील अस्थिरता वेदनादायी होती.
रांची (झारखंड) : झारखंड राज्याची निर्मिती झाल्यानंतर रघुबर दास सरकार येईपर्यंतच्या काळातील अस्थिरता वेदनादायी होती. दास सरकारने गेल्या पाच वर्षांत राज्याला स्थैर्य प्राप्त करून दिले, असे माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी येथे म्हटले.
प्रसाद म्हणाले, भाजपचे झारखंडशी भावनात्मक नाते आहे; परंतु काही स्वार्थी लोक राज्यात स्थैर्य निर्माण होऊ देत नाहीत. रघुबर दास यांचे सरकार हे पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण करणारे पहिलेच सरकार आहे. त्या आधी २००० ते २०१४ या कालावधीत तीन वेळा राष्ट्रपती राजवटीसह नऊ सरकारे येऊन गेली. झारखंडशी भाजपचे भावनात्मक आणि नैतिक नाते आहे. स्वतंत्र झारखंड राज्याची मागणी झाली तेव्हा तिला जनसंघाने व भाजपने पाठिंबा दिला होता; परंतु जेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार केंद्रात आले तेव्हाच झारखंडची निर्मिती झाली, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.
भाजपचा झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसाद यांच्या हस्ते व मुख्यमंत्री दास व इतरांच्या उपस्थितीत प्रकाशित झाल्यावर ते म्हणाले, अर्जुन मुंडा हे मुख्यमंत्री असताना त्यांनी चांगले काम केले व विकासासाठी प्रयत्नही
केले. (वृत्तसंस्था)