राहुल द्रविडचा मुलगा समितनं झळकावलं शतक
By Admin | Published: April 21, 2016 06:25 PM2016-04-21T18:25:29+5:302016-04-21T18:28:27+5:30
राहुल द्रविडचा मुलगा समित यानं 14 वर्षांखालील शालेय स्तरातल्या सामन्यात शतक झळकावलं आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, 21- राहुल द्रविडचा मुलगा समित यानं 14 वर्षांखालील शालेय स्तरातल्या सामन्यात शतक झळकावलं आहे. ऑक्टोबरमध्ये समित द्रविड 11व्या वर्षांत पदार्पण करतो आहे. बंगलोरमध्ये 14 वर्षांखालील झालेल्या सामन्यात समित यानं 125 धावा काढल्यात. समित हा फ्रँक अँथोनी शाळेविरुद्ध बंगलोर युनायटेड क्रिकेड क्लबतर्फे टायगर कपसाठी खेळत होता. या सामन्याद्वारे मुलांमध्ये वाघांबाबत जनजागृती करण्यात प्रयत्न करण्यात आला आहे. सुमित द्रविड आणि प्रत्युष जी या जोडीनं 213 धावा काढल्या आहेत. त्यांच्या 143 धावा या लक्षणीय होत्या. बंगलोर युनायटेड क्रिकेट क्लबनं 246 धावा काढून विजय मिळवला आहे. तर फ्रँक अँथोनी शाळेनं 80 धावांमध्येच गाशा गुंडाळला आहे. सचिन तेंडुलकरचा पुत्र अर्जुन तेंडुलकर आणि राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविड नेहमीच चर्चेत असतात. समितला 2015ला 12 वर्षांखालील मुलांच्या गटात चांगला बॅट्समन होण्याचा मान मिळाला होता. राहुल द्रविड आयपीएलसाठी सध्या दिल्ली डेअरडेव्हिलकडून खेळण्यात मग्न आहे. राहुल द्रविडही 19 वर्षांखालील सामन्यातून खेळून पुढे आला होता.