राहुल गांधींनी केला काँग्रेसचा पराभव मान्य

By admin | Published: May 19, 2016 12:31 PM2016-05-19T12:31:24+5:302016-05-19T14:23:58+5:30

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीत झालेला पक्षाचा पराभव मान्य केला आहे

Rahul Gandhi admits defeat of Congress | राहुल गांधींनी केला काँग्रेसचा पराभव मान्य

राहुल गांधींनी केला काँग्रेसचा पराभव मान्य

Next
ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 19 - पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी या पाचही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस चमकदार कामगिरी करु शकलेली नाही. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाचा पराभव मान्य केला आहे. 'निवडणुकीत मेहनत घेणा-या प्रत्येक काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या नेता आणि कार्यकर्त्याचे मी आभार मानतो. आपण नम्रपणे लोकांनी दिलेला निर्णय मान्य करत जिंकलेल्या पक्षाचं अभिनंदन करतो. लोकांचा विश्वास जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत अजून कष्ट घेऊ', असं राहुल गांधी बोलले आहेत. 
 
( इथे पाहा २०१६ विधानसभा निवडणूक निकाल) 
 
महत्वाचं म्हणजे आसामसमध्ये काँग्रेसला सर्वात मोठा फटका बसला असून गेल्या 15 वर्षांपासून असलेले एकहाती वर्चस्व संपुष्टात आले आहे. आसाममध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पक्ष सत्तेत येणार असल्याचं चित्र आहे.  126 जागा असलेल्या या विधानसभेत सत्ता स्थापनेसाठी 64 जागांची गरज आहे. मात्र इथे भाजपाने 75 जागांवर आघाडी मिळवली आहे.
 
भाजपाने आघाडी घेतली असताना काँग्रेसला मात्र फक्त 29 जागांवरच आघाडी मिळवता आली आहे. ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटला 13 जागांवर आघाडी मिळाली आहे. 
 

Web Title: Rahul Gandhi admits defeat of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.