राहुल गांधींनी क्षमा मागावी : आरएसएस
By admin | Published: August 27, 2016 04:32 AM2016-08-27T04:32:10+5:302016-08-27T04:32:10+5:30
संघाबाबत मी केलेले विधान योग्यच असल्याच्या काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतलेल्या भूमिकेवर संघाने शुक्रवारी प्रश्न विचारले आहेत
सुरेश भटेवरा,
नवी दिल्ली- महात्मा गांधी यांच्या हत्येसंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत मी केलेले विधान योग्यच असल्याच्या काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतलेल्या भूमिकेवर संघाने शुक्रवारी प्रश्न विचारले आहेत. राहुल गांधी हे यांच्या शपथपत्रातील मजकुराबद्दल बोलत आहेत की भाषणाबद्दल? असे विचारून त्यांनी क्षमा मागावी अशी मागणीही केली आहे.
मी जे संघाबद्दल बोललो त्यात काही बदल नाही, असे राहुल गांधी म्हणाले. कोणत्या शब्दाबद्दल? शपथपत्रातील की सार्वजनिकरित्या केलेल्या भाषणांतील, असा प्रश्न संघाचे संपर्क विभागाचे प्रमुख मनमोहन वैद्य यांनी विचारला आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसने खोटे बोलणे बंद करून क्षमा मागितली पाहिजे. संघाच्या फेसबुक अकाऊंटवरील ‘सत्यमेव जयते’ या पोस्टवर म्हटले की, ‘द स्टेटसमन’ने २००० च्या संपादकीयावरून झालेल्या कायदेशीर लढाईत २००३ मध्ये क्षमा मागितली होती.