राहुल गांधी यांना अटक

By Admin | Published: June 9, 2017 06:06 AM2017-06-09T06:06:57+5:302017-06-09T06:50:29+5:30

शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मंदसौरकडे जात असताना गुरुवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Rahul Gandhi arrested | राहुल गांधी यांना अटक

राहुल गांधी यांना अटक

googlenewsNext

नया गाव (मध्य प्रदेश) : पोलीस गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मंदसौरकडे जात असताना गुरुवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची पाच तासांनंतर सुटका करण्यात आली. त्यानंतर मध्य प्रदेश व राजस्थानच्या सीमेवर या शेतकऱ्यांचे कुटुंबीय राहुल गांधी यांना भेटले. मी केवळ त्यांना भेटायला आलो होतो. पण सरकार त्यालाही घाबरले, असे या वेळी राहुल म्हणाले.
श्रीमंतांचे १.५० लाख कोटींचे कर्ज मोदी माफ करू शकतात; पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू शकत नाहीत. शेतमालाला योग्य दर देऊ शकत नाहीत. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि बोनस देऊ शकत नाहीत. ते शेतकऱ्यांना फक्त गोळ्या देऊ शकतात, अशी टीका त्यांनी केली.
निमच येथून पुढे गेल्यानंतर पोलिसांनी राहुल गांधी यांना रोखले. या वेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘जय जवान, जय किसान’, ‘राहुल गांधी जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. राहुल गांधी यांच्यासह राजस्थान काँग्रेसचे प्रमुख सचिन पायलट, आमदार जयवर्धन सिंह आणि शेकडो कार्यकर्त्यांना या वेळी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना एका गेस्टहाउसमध्ये नेले.
>राहुल यांच्यासोबत ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह व कमलनाथ हेही होते. राजस्थानच्या चित्तोडगढ जिल्ह्यातील दलिया गावातून मध्य प्रदेशमध्ये चालूून प्रवेश केला. मध्य प्रदेशात प्रवेशापूर्वी राहुल गांधी हे चित्तोडगढ जिल्ह्यात निम्बाहेडपासून पाच ते सात किमी मोटारसायकलवरून गेले.
सोबत २ हजार लोक, १५० वाहने होती. शेतकऱ्यांच्या मृत्यूला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान जबाबदार आहेत.
- राहुल गांधी, कॉँग्रेस उपाध्यक्ष

Web Title: Rahul Gandhi arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.