राहुल गांधी ब्रिटीश नागरिक ही टायपिंगमधील चूक - UK चे स्पष्टीकरण
By admin | Published: November 17, 2015 11:34 AM2015-11-17T11:34:01+5:302015-11-17T11:34:26+5:30
राहुल गांधी यांना ब्रिटीश नागरिक दाखवले जाणे ही टायपिंगमधील चूक असू शकते असे स्पष्टीकरण युरोपी/ महासंघाच्या कंपनी हाऊस विभागातर्फे देण्यात आले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - राहुल गांधी यांना ब्रिटीश नागरिक दाखवले जाणे ही टायपिंगमधील चूक असू शकते असे स्पष्टीकरण युरोपी/ महासंघाच्या कंपनी हाऊस विभागातर्फे देण्यात आले आहे. कंपनीतर्फे पाठवण्यात आलेल्या माहितीची आम्ही सत्यता पडताळण्याचे अधिकार आमच्याकडे नाहीत पण ती माहिती सार्वजनिक केली जाते असेही विभागाने म्हटले आहे.
सोमवारी भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींकडे भारतासोबतच ब्रिटनचे नागरिकत्व असल्याचा आरोप केला होता. यासाठी स्वामी यांनी काही कागदपत्रही सादर केली होती. ब्रिटीश कंपनीतील कागदपत्रांमध्ये राहुल गांधी यांनी ब्रिटीश नागरिक असल्याचा उल्लेख केल्याचे स्वामी यांनी म्हटले होते. काँग्रेसने स्वामींच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही असे स्पष्ट केले होते.
राहुल गांधींच्या वादावर आता युरोपिय महासंघाच्या कंपनी विभागातर्फे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 'कंपनी विभागात माहिती देणा-या व्यक्तीने ही चुक केली असावी. आम्ही सर्व कागदपत्र सादर झाली की नाही, त्यावर स्वाक्षरी आहे की नाही याची तपासणी करतो. पण त्या कागदपत्रांची सत्यता पडताळणे आम्हाला शक्य नाही असे कंपनी विभागातील अधिका-यांनी सांगितले.