जीएसटीवर राहुल यांची काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा
By Admin | Published: November 29, 2015 02:58 AM2015-11-29T02:58:57+5:302015-11-29T02:58:57+5:30
वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विधेयकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर दुसऱ्याच
नवी दिल्ली : वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विधेयकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शनिवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत या मुद्यावर विचारविनिमय केला.
लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीत सहभागी होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, हे विधेयक पारित व्हावे अशी काँग्रेसची इच्छा आहे. परंतु यासंदर्भातील आमचे आक्षेप दूर होणे आवश्यक आहे. काँग्रेसने उपस्थित केलेल्या मुद्यांवर तोडगा निघाल्यास पक्ष या दिशेने पुढचे पाऊल उचलण्यास तयार आहे.
जीएसटी विधेयकाबाबत काँग्रेसच्या तीन अटी आहेत. या अटींची पूर्तता करण्याची पक्षाची मागणी आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)