राहुल गांधींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

By admin | Published: February 28, 2016 08:36 PM2016-02-28T20:36:13+5:302016-02-28T20:38:45+5:30

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबराबादमधील सरुरनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे

Rahul Gandhi files sedition charges | राहुल गांधींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

राहुल गांधींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

Next
>ऑनलाइन लोकमत - 
तेलंगणा, दि. २८ - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबराबादमधील सरुरनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एएनआयने दिलेल्या माहितीप्रमाणे फक्त राहुल गांधींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. 
 
राहुल गांधींसोबतच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, डी राजा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस नेते आनंद शर्मा यांच्याविरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार, उमर खालीद यांच्याविरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 

Web Title: Rahul Gandhi files sedition charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.