राहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 02:13 PM2018-12-14T14:13:04+5:302018-12-14T15:13:27+5:30

सर्वोच्च न्यायालयानं राफेल करारावरून मोदी सरकारला क्लीन चिट दिल्यानंतर अमित शाहांनी राहुल गांधीवर निशाणा साधला आहे.

Rahul Gandhi misleading country on Rafael's issue - Amit Shah | राहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शाह

राहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शाह

Next
ठळक मुद्दे भाजपाध्यक्ष अमित शाहांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी राफेलच्या मुद्द्यावरून देशाची दिशाभूल केली राहुल गांधींनी आता तरी बालिशपणा सोडावा

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयानं राफेल करारावरून मोदी सरकारला क्लीन चिट दिल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शाहांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी राफेलच्या मुद्द्यावरून देशाची दिशाभूल केली आहे. त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून सत्याचा विजय झाला आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेसला फायदा पोहोचवण्यासाठीच राफेलवरून राजकारण केल्याचा आरोपही भाजपा अध्यक्ष अमित शाहांनी केला आहे. असत्य निराधार असते. त्यामुळेच नेहमी सत्याचा विजय होतो. ते नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच राहुल गांधींनी आता तरी बालिशपणा सोडावा, असंही ते म्हणाले. आहेत.  




राफेल विमान खरेदी प्रक्रियेत केंद्र सरकारची ऑफसेट भागीदार निवडण्यात कोणतीही भूमिका नाही, राहुल गांधी देशाच्या सुरक्षेशी खेळत आहेत. 2001मध्ये हवाई दलानं विमानांची मागणी केली होती. 2004मध्ये प्रक्रिया सुरू केली. परंतु 2007 ते 2014पर्यंत कोणताही करार करण्यात आला नाही. त्यावेळी करार का नाही करण्यात आला, आधी याचं उत्तर राहुल गांधींनी द्यावं, त्याप्रमाणेच राफेल कराराची माहिती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडे कशी पोहोचली, याची माहिती त्यांनी सार्वजनिक करावी. काँग्रेसनं कमिशनसाठीच राफेल कराराला लक्ष्य केलं तर नाही ना, अशी शंका आता उपस्थित होत आहे. काँग्रेसच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात 12 लाख कोटींची घोटाळे झाले आहेत, असा आरोपही भाजपाध्यक्ष अमित शाहांनी केला आहे. 



Web Title: Rahul Gandhi misleading country on Rafael's issue - Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.