परदेशातून राहुल गांधी परतले

By admin | Published: January 11, 2017 01:11 AM2017-01-11T01:11:15+5:302017-01-11T01:11:15+5:30

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी परदेशातून सोमवारी रात्री भारतात परतले असून, मंगळवारी सकाळी राहुलची भेट घेण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि प्रियंका वाड्रा

Rahul Gandhi returned from abroad | परदेशातून राहुल गांधी परतले

परदेशातून राहुल गांधी परतले

Next

सुरेश भटेवरा / नवी दिल्ली
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी परदेशातून सोमवारी रात्री भारतात परतले असून, मंगळवारी सकाळी राहुलची भेट घेण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि प्रियंका वाड्रा त्यांच्या निवासस्थानी गेल्या. कॅप्टन अमरिंदरसिंगही यावेळी त्यांना भेटावयास गेले होते. पाठोपाठ काँग्रेस नेत्यांची वर्दळही तिथे सुरू झाली.
राहुल गांधींच्या अनुपस्थितीत देशात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. नोटाबंदी निर्णयाचे ५0 दिवस पूर्ण झाल्यानंतर ३१ डिसेंबर रोजी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. उत्तर प्रदेशात काँग्रेस या काळात समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव गटाशी आघाडी करण्याचे मनसुबे रचत असल्याच्या चर्चेला उधाण आले. पंजाबमध्ये काँग्रेसतर्फे नवज्योतसिंग सिद्धू निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर झाले. सिद्धू दिल्लीत असून त्यांनाही राहुलच्या आगमनाची प्रतिक्षा होती. राहुल यांच्या अनुपस्थितीत विरोधकांच्या नोटाबंदीविरोधी आघाडीचे ममता बॅनर्जींनी नेतृत्व केले. त्यांनी थेट पंतप्रधान मोदींचा राजीनामा मागून देशात राष्ट्रीय सरकार स्थापन करण्याची मागणी केली.
सोनिया गांधीच्या भेटीनंतर राहुल गांधींनी पाच राज्यांच्या निवडणूक रणनीतीशी संबंधित बैठकांना सुरुवात केली. पंजाब त्यात अग्रक्रमावर आहे. राहुलना सिद्धूही भेटणार आहेत. उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी पंजाब, उत्तराखंड व गोवा येथील प्रदेश निवडणूक समितीच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. या बैठकांना राहुल स्वत: उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचाही तळ मंगळवारी दिल्लीतच आहे. उत्तर प्रदेशात अखिलेश गटाबरोबर काँग्रेसच्या समझोत्याविषयी अधिकृतपणे कोणीही भाष्य केले नसले तरी राहुल गांधी आणि अखिलेश यादवांची भेट होऊ शकते.

Web Title: Rahul Gandhi returned from abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.