५६ दिवसांनी परतले राहुल गांधी
By admin | Published: April 17, 2015 01:52 AM2015-04-17T01:52:56+5:302015-04-17T01:52:56+5:30
संपूर्ण देशाचे डोळे ज्यांच्या परतीकडे लागले ते काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी ५६ दिवसांची ‘आत्मचिंतन’ सुटी संपवून गुरुवारी मायदेशी परतले.
नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे डोळे ज्यांच्या परतीकडे लागले ते काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी ५६ दिवसांची ‘आत्मचिंतन’ सुटी संपवून गुरुवारी मायदेशी परतले.
संसद अधिवेशनाच्या काळात भूसंपादनावरून सरकारविरोधात काँग्रेसने रण्शिंग फुंकले असतानाच त्यांनी सुटी घेतल्याने तर्कवितर्क सुरू झाले होते. राहुल यांच्या ठावठिकाण्याबाबत कमालीची गुप्तता राखली गेल्याने त्यांच्या परतण्याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ते परतताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर फटाके फोडून जल्लोष केला. येत्या दोन दिवसांत राहुल गांधी अमेठी या आपल्या मतदारसंघाला भेट देतील अशी शक्यता आहे.
काँग्रेसने १९ एप्रिल रोजी रामलीला मैदानावर शेतकऱ्यांची रॅली आयोजित केली असून, तिला ते संबोधित करण्याची दाट शक्यता आहे.