मोदींविरोधात राहुल गांधींनी डोंगर पोखरुन काढला उंदीर
By admin | Published: December 21, 2016 09:56 PM2016-12-21T21:56:43+5:302016-12-21T21:56:43+5:30
सहाराच्या डायरीमध्ये तशी नोंद आहे. ही सर्व कागदपत्रे आयकर खात्याकडे असून त्याची चौकशी का झाली नाही ? या व्यवहाराची चौकशी झाली पाहिजे असे आयकर खात्याचे मत आहे असा आरोप राहुल गांधी
ऑनलाइन लोकमत
मेहसाणा, दि. 21 - सहा महिन्यात नऊ वेळा सहारा समूहाने नरेंद्र मोदींना पैसा दिला. सहाराच्या डायरीमध्ये तशी नोंद आहे. ही सर्व कागदपत्रे आयकर खात्याकडे असून त्याची चौकशी का झाली नाही ? या व्यवहाराची चौकशी झाली पाहिजे असे आयकर खात्याचे मत आहे असा आरोप राहुल गांधी यांनी गुजरातच्या मेहसाणामध्ये जाहीर सभेमध्ये बोलताना केला. काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी नरेंद्र मोदीं विरोधात भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.
हे तर जुनंच प्रकरण....
2012-13 मध्ये आयकर खात्याने टाकलेल्या धाडीमध्ये आदित्य बिर्ला समूहातील अधिका-यांच्या डाय-या, लॅपटॉप आदी जप्त करण्यात आले होते. यामध्ये गुजरात मुख्यमंत्री या नावाने 25 कोटी रुपयांची नोंद आढळली होती. याचा आधार घेत अरविंद केजरीवाल व प्रशांत भूषण यांनी मोदींविरोधात झोड उठवली होती. तसेच सुप्रीम कोर्टातही धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हा पुरेसा पुरावा नसल्याचे सांगत कारवाईस नकार दिला होता.
राहुल गांधींनी मोदींविरोधात वैयक्तिक भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आणि सज्जड पुरावे असल्याचा दावा केला होता. मात्र आजच्या गुजरातमधल्या सभेत राहुल गांधींनी हे जुनेच प्रकरण उकरल्यामुळे डोंगर पोखरुन उंदीर काढल्याची भावना व्यक्त होत आहे.
नऊवेळा प्रत्येकी पाच कोटी रुपये असे एकूण मिळून 45 कोटी रुपये मोदींना दिल्याचा सहाराच्या डाय-यांमध्ये उल्लेख आहे.
Rahulji asks if Modiji received this money from Sahara or not? If this document is with Income Tax,will Modiji now investigate it? pic.twitter.com/YhVy5Pr0y8
— Randeep S Surjewala (@rssurjewala) 21 December 2016