राहुल गांधी यांनी झापल्यावर काँग्रेस नेत्याची माफी, भाजपा नेत्यांच्या जातीचा केला होता उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 05:33 AM2018-11-24T05:33:46+5:302018-11-24T05:34:17+5:30

वादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेसचे नेते सी. पी. जोशी यांची अध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीर कानउघाडणी केल्यानंंतर जोशी यांनी माफी मागितली आहे.

 Rahul Gandhi said that the Congress leader's apology, BJP leader's caste had been given to him | राहुल गांधी यांनी झापल्यावर काँग्रेस नेत्याची माफी, भाजपा नेत्यांच्या जातीचा केला होता उल्लेख

राहुल गांधी यांनी झापल्यावर काँग्रेस नेत्याची माफी, भाजपा नेत्यांच्या जातीचा केला होता उल्लेख

Next

नवी दिल्ली : हिंदुत्वाबद्दल फक्त ब्राह्मणांनाच बोलण्याचा अधिकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उमा भारती, साध्वी ऋतंबरा हे ब्राह्मणेतर असल्याने ते हिंदुत्वाबद्दल कसे काय बोलू शकतात? असे वादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेसचे नेते सी. पी. जोशी यांची अध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीर कानउघाडणी केल्यानंंतर जोशी यांनी माफी मागितली आहे.
नाथद्वारा येथे केलेल्या भाषणात जोशी म्हणाले की, हिंदू धर्माविषयीचे ज्ञान फक्त ब्राह्मण व पंडितांना असते. उमा भारती लोधी जातीतल्या आहेत. मोदींसह ब्राह्मणेतर नेत्यांना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. काँग्रेसजन हे हिंदू नाहीत असा भाजपा नेते प्रचार करतात. यांना अशी प्रमाणपत्रे देण्याचा अधिकार कोणी दिला? भाजपाने विद्यापीठ स्थापन केले आहे की काय?
टीका होऊ लागताच, राहुल गांधी यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हणाले की, समाजातील कोणत्याही वर्गाच्या भावना दुखावतील अशी वक्तव्ये काँग्रेस नेत्यांनी करू नये अशी समजही त्यांनी दिली. त्यानंतर जोशी यांनी माफी मागितली.

Web Title:  Rahul Gandhi said that the Congress leader's apology, BJP leader's caste had been given to him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.