राहुल गांधींनी जवानांसाठी पंतप्रधान मोदींना पाठवले पत्र

By admin | Published: October 29, 2016 12:35 PM2016-10-29T12:35:04+5:302016-10-29T13:00:53+5:30

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतीय जवानांप्रती आदर व्यक्त करणारे पत्र लिहिले आहे.

Rahul Gandhi sent a letter to Prime Minister Modi for the soldiers | राहुल गांधींनी जवानांसाठी पंतप्रधान मोदींना पाठवले पत्र

राहुल गांधींनी जवानांसाठी पंतप्रधान मोदींना पाठवले पत्र

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 29 - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतीय जवानांप्रती आदर व्यक्त करणारे पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी सीमारेषेवरील जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देत, जवानांबाबत असलेली कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच या पत्राद्वारे त्यांनी प्राधान्याने जवानांच्या हक्काचे पेन्शन आणि भरपाई मिळवून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.  माजी सैनिकांसाठी 'वन रँक वन पेन्शन' योजनेची योग्य रितेने अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या सीमेवर आयटीबीपीच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मोदींना पत्र लिहिले आहे. दिवाळीनिमित्ताने उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात भारत-चीनच्या सीमेवर माणा येथे आयटीबीपीच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. पंतप्रधान मोदी दिल्लीहून वायुसेनेच्या विशेष विमानाने गौचर येथे पोहोचतील यावेळी एमआय 17 हे हेलीकॉप्टरही त्यांच्या सोबत असेल. तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे देखील उपस्थित असणार आहेत. 
 

Web Title: Rahul Gandhi sent a letter to Prime Minister Modi for the soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.