राहुल गांधींनी सांभाळावी काँग्रेसची धुरा
By admin | Published: June 6, 2016 02:04 AM2016-06-06T02:04:16+5:302016-06-06T02:04:16+5:30
‘राहुल गांधी हे वस्तुत: काँग्रेसचे अध्यक्षच आहेत. परंतु त्यांनी आता कायदेशीररीत्या पक्षाध्यक्ष बनले पाहिजे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध सरकारविरोधी लाट निर्माण होण्याची प्रतीक्षा
नवी दिल्ली : ‘राहुल गांधी हे वस्तुत: काँग्रेसचे अध्यक्षच आहेत. परंतु त्यांनी आता कायदेशीररीत्या पक्षाध्यक्ष बनले पाहिजे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध सरकारविरोधी लाट निर्माण होण्याची प्रतीक्षा न करता पक्षाला राजकीय लढाईसाठी तयार करायला पाहिजे,’ असे रमेश यांनी केले आहे.
बदलत्या भारतानुसार काँग्रेसनेही स्वत:ला बदलले पाहिजे, ही काळाची गरज आहे. कारण आमची संपर्क रणनीती फारशी प्रभावी नाही. लागोपाल पदरात पडलेल्या निवडणूक पराभवाच्या पार्श्वभूमीवर आम्ही समाजाच्या विविध घटकांपर्यंत आक्रमकपणे पोहोचण्याची आवश्यकत आहे, असे रमेश म्हणाले.
नरेंद्र मोदी हे सातत्याने ‘काँग्रेसमुक्त भारता’चे आवाहन करीत आहेत. त्यावर भाष्य करताना माजी केंद्रीय मंत्री रमेश म्हणाले, ‘आव्हाने फार मोठी आहेत. परंतु निराश होण्यासाठी कोणतीही जागा नाही. काँग्रेसला खारीज करणारे लोक वेळेआधीच मृत्युलेख लिहीत आहेत.
राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व सोपविण्यात आले पाहिजे, असे नमूद करून रमेश पुढे म्हणाले, अनिश्चिततेत राहिल्याने काहीही फायदा होणार नाही. सध्या काँग्रेस ज्या आव्हानांचा सामना करीत आहे ती आव्हाने मार्च १९८८ मध्ये सोनिया गांधी यांनी जेव्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले होते, त्या काळासारखीच आहेत. काँग्रेस पक्ष संघटनेच्या पुनर्रचनेबाबत राहुल गांधी यांच्याजवळ अनेक चांगल्या कल्पना आहेत. ते लवकरच पक्षाध्यक्षपदाची धुरा हाती घेतील, अशी मला आशा आहे. ते वस्तुत: पक्षाध्यक्षच आहेत. परंतु त्यांनी आता वास्तविक अध्यक्ष बनायचे आहे. (वृत्तसंस्था