दलित मारहाणीवर चर्चा सुरु असताना राहुल गांधी झोपले

By admin | Published: July 20, 2016 03:03 PM2016-07-20T15:03:50+5:302016-07-20T15:08:29+5:30

गुजरातच्या उनामध्ये चार दलित युवकांना झालेल्या मारहाणीचा मुद्यावरुन काँग्रेसने आज लोकसभेमध्ये सत्ताधा-यांना धारेवर धरले.

Rahul Gandhi sleeping while discussing Dalit marijuana | दलित मारहाणीवर चर्चा सुरु असताना राहुल गांधी झोपले

दलित मारहाणीवर चर्चा सुरु असताना राहुल गांधी झोपले

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २० - गुजरातच्या उनामध्ये चार दलित युवकांना झालेल्या मारहाणीचा मुद्यावरुन काँग्रेसने आज लोकसभेमध्ये सत्ताधा-यांना धारेवर धरले. मात्र हा मुद्दा उपस्थित करणा-या काँग्रेसची चांगलीच पंचाईत झाली. कारण या महत्वाच्या विषयावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह बोलत असताना राहुल गांधी चक्क डुलक्या घेत होते.
 
राहुल गांधींच्या या डुलक्या कॅमे-याने टिपल्या. राजनाथ सिंह यांचे भाषण चालू  असताना काँग्रेसचे खासदार विरोध करत होते. घोषणाबाजी सुरु होती. त्यावेळी राहुल गांधी झोपले होते. कॅमे-यांनी हे दृश्य टिपले. राहुल गांधी उद्या उन्नाला भेट देणार आहेत. 

Web Title: Rahul Gandhi sleeping while discussing Dalit marijuana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.