पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेमुळे राहुल गांधी अस्वस्थ - स्मृती इराणी
By admin | Published: January 12, 2017 02:49 PM2017-01-12T14:49:46+5:302017-01-12T15:03:37+5:30
आपला राजकीय वारसा जपण्यासाठी राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर अपमानकारक टीका करत असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दिली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे राहुल गांधी अस्वस्थ असून आणि केवळ आपला राजकीय वारसा वाचवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत'.
'सुट्टीहून परतल्यानंतर आणि आत्मचिंतनानंतर राहुल गांधी यांचे लक्ष थोडेसे विचलित झाले आहे. कारण पंतप्रधानांची लोकप्रियता वाढत आहे. पंतप्रधान मोदींवर अपमानकारक टीका करुन आपला राजकीय वारसा जपण्यासाठी राहुल गांधी यांनी प्रयत्न करणं स्वाभाविक आहे', असा टोलाही स्मृती इराणी यांनी यावेळी हाणला आहे.
बुधवारी 'जन वेदना' आंदोलनात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदी निर्णयावर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा टार्गेट केले होते. पंतप्रधान मोदींनी लोकसभा निवडणुकांपूर्वी अच्छे दिन आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते पूर्ण करू शकले नाहीत. काँग्रेसच 2017 मध्ये अच्छे दिन आणू शकेल, असे सांगत पंतप्रधान मोदींच्या चुकीच्या निर्णयामुळे देशाचे जगात हसे होत आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.
मोदी यांच्या नोटाबंदी निर्णयामुळे अर्थव्यवस्था 16 वर्षे मागे गेली आहे. भाजपा, आरएसएस आणि मोदी यांनी अडीच वर्षांच्या काळात आरबीआय, न्यायपालिका आणि निवडणूक आयोग या संस्थांना कमकुवत केले आहे. या संस्था भारताचा आत्मा आहेत. त्यांना या सरकारने दुर्बल केले आहे. तर, मनरेगाच्या कामात अचानक वाढ का झाली आहे? लोक शहराच्या ऐवजी गावाकडे का जात आहेत? हे मोदी यांना विचारायला हवे, असेही ते म्हणाले होते.
राहुल गांधींनी केेलेल्या टीकेबाबत प्रसिद्धी माध्यमांनी स्मृती इराणींना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी पंतप्रधानांच्या लोकप्रियतेमुळे राहुल गांधी अस्वस्थ झाल्याची खोचक टीका केली.
Swabhavik hai Rahul chhutti se lautne aur attmachintan karne ke baad thode vichlit hue honge ki PM ki popularity badh rhi hai: Smriti Irani pic.twitter.com/1sHLcaXPlt
— ANI (@ANI_news) 12 January 2017
So Rahul Gandhi making derogatory comments against PM and trying to save his political legacy is natural: Smriti Irani,Union Textiles Min pic.twitter.com/CdKWij4UjA
— ANI (@ANI_news) 12 January 2017