‘राहुल गांधींच्या बढतीनंतरही ज्येष्ठांना भूमिका असेलच’
By admin | Published: October 23, 2015 01:43 AM2015-10-23T01:43:33+5:302015-10-23T01:43:33+5:30
राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाल्यास पक्षातील वरिष्ठ नेत्यांना हद्दपार व्हावे लागेल, या गप्पांना ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी फेटाळून लावले. भाजपमध्ये ‘मार्गदर्शक मंडळ’ असे
नवी दिल्ली : राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाल्यास पक्षातील वरिष्ठ नेत्यांना हद्दपार व्हावे लागेल, या गप्पांना ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी फेटाळून लावले. भाजपमध्ये ‘मार्गदर्शक मंडळ’ असे नाव देऊन ज्येष्ठ नेत्यांना मार्गदर्शक, सल्लागार म्हणून काम दिले जाते. प्रत्यक्षात त्यांना प्रवाहातून बाहेर टाकलेलेच असते. हा भाजपमध्ये प्रकार चालतो. ती कल्पना आम्ही उसनी घेणार नाही, असे सिंह म्हणाले. मार्चमध्ये राहुल पक्षाचे अध्यक्ष बनू शकतील का, असे त्यांना विचारले असता, दिग्विजय सिंह म्हणाले की, ‘अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय हा पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाची कार्यकारी समिती घेईल. याबद्दल मला काही भाकीत करता येणार नाही.’ पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्याला राहुलना आता बढती मिळाली पाहिजे, असे वाटते, परंतु याचा निर्णय पक्षाध्यक्षाच घेऊ शकतात, असे ते म्हणाले.