आसाममध्ये सत्ता आल्यास नागपूर किंवा पीएमओ सरकार चालवणार - राहुल गांधी
By admin | Published: March 29, 2016 03:04 PM2016-03-29T15:04:22+5:302016-03-29T15:40:38+5:30
भाजपा निवडणूक जिंकल्यास आसाम सरकारचा कारभार नागपूर, पंतप्रधान कार्यालय येथून चालवला जाईल असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
आसाम, दि. २९ - भाजपा निवडणूक जिंकल्यास आसाम सरकारचा कारभार नागपूर, पंतप्रधान कार्यालय येथून चालवला जाईल, आम्हाला आसामचा कारभार आसाममधूनच चालवायचा आहे असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. आसासमध्ये प्रचारसभेदरम्यान बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आम्ही आसाममध्ये कोणत्या धर्माचं, व्यक्तीचं सरकार बनवणार नाही तर प्रत्येकाचं सरकार बनवणार असल्याचं आश्वासन राहुल गांधींनी यावेळी दिलं.
भाजपा सर्व देशावर एकच विचासरणी थोपण्याचा प्रयत्न करत आहे, देश एका विचारसणीवर चालत नाही. मोदी येऊन फक्त वचन देतात आणि निघून जातात. मोदींनी दिलेल्या आश्वासनांपैकी किती आश्वासने त्यांनी पुर्ण केली. आसामला मिळणारा विशेष दर्जा मोदींना काढून घेतला ज्यामुळे काँग्रेस सरकारच्या राज्यात मिळणारी करोडोंची मदत थांबली असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.
काँग्रेसने गेल्या 15 वर्षात आसाममध्ये शांतता आणली, ही आपली खुप मोठी कामगिरी आहे. हरियाणामध्ये 10 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, कोणतीही दंगल, हिंसा झाली नव्हती. भाजपा सरकार आल्यानंतर हरियाणामध्ये महिन्याभरात हिंसा सुरु होते, जाट आणि इतर लोकांमध्ये भाडणं लावली जात आहेत. भाजपा जिथे जाते तिथे लोकांमध्ये हिंसा भडकवते असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे.
विजय मल्ल्या, ललित मोदी सहजपणे देशातून पळून गेले, त्यांना परत आणण्याचा काहीच प्रयत्न केला गेला नाही. विजय मल्ल्याची संसदेत एका मंत्र्याशी भेट झाली आणि त्यानंतर तो सहज पळून गेल्याचा आरोप करत राहुल गांधींनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला.