राजा निर्वस्र पण सांगणार कोण, राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 11:52 PM2017-07-21T23:52:45+5:302017-07-21T23:52:45+5:30
राजा निर्वस्र आहे, पण सांगणार कोण अशा शब्दात राहुल गांधींनी आज मोदींवर हल्लाबोल केला. आज देशात भावनेच्या आधारावर लोकशाहीला बंदीस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 21 - राजा निर्वस्र आहे, पण सांगणार कोण अशा शब्दात राहुल गांधींनी आज मोदींवर हल्लाबोल केला. आज देशात भावनेच्या आधारावर लोकशाहीला बंदीस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे काम नोकरशहा, पंतप्रधान आणि संघाकडून करण्यात येत आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
बंगळुरू येथे आयोजित कार्यक्रमात राहुल गांधी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी मोदी, भाजपा आणि संघावर निशाणा साधला. ते म्हणाले, "हिटलरने सांगितले होते. वास्तवावर पकड ठेवा, म्हणजे कधीही गडबड करता येईल. आज देशात हेच होत आहे. आज देशात भावनेच्या आधारावर लोकशाहीला बंदीस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे काम नोकरशहा, पंतप्रधान आणि संघाकडून करण्यात येत आहे."
याआधी काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी जीएसचीवरून सरकारवर टीका केली होती. एसटी घाईघाईमध्ये लागू करु नका हे आम्ही सरकारला सांगत होतो. पण त्यांनी आमचे ऐकले नाही. सरकार जीएसटी लागू केल्याचा आनंद साजरा करत आहे. पण जीएसटीमध्ये अनेक त्रुटी, उणिवा आहेत. ज्यामुळे सर्वसामान्य जनता, छोटया व्यापा-यांचे नुकसान होत आहे अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जीएसटीच्या मुद्यावरुन नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य केले. राजस्थानच्या बंसवाडा येथे त्यांची जाहीर सभेत बोलताना त्यांनी टीका केली.
अधिक वाचा
राहुल गांधी आहेत म्हणून उत्सव मंडळाचे फावलेय - उद्धव ठाकरे
सरकारकडून मोठमोठी आश्वासने दिली जात आहेत पण शेतक-यावर कर्जाचा बोजा आहे. मी जीएसटी लागू केला हे मोदींना जगाला दाखवायचे होते. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जीएसटी लागू केला ते दाखवायचे होते. पण हा देश अमेरिकेचा नाही. हा देश इथल्या जनतेचा, शेतक-यांचा आहे असे राहुल गांधी म्हणाले.
सरकारकडून मोठमोठी आश्वासने दिली जात आहेत पण शेतक-यावर कर्जाचा बोजा आहे. मी जीएसटी लागू केला हे मोदींना जगाला दाखवायचे होते. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जीएसटी लागू केला ते दाखवायचे होते. पण हा देश अमेरिकेचा नाही. हा देश इथल्या जनतेचा, शेतक-यांचा आहे असे राहुल गांधी म्हणाले.