राहुल गांधींसमोरचं झाला मोदी-मोदींचा जयकार
By admin | Published: November 18, 2016 09:43 AM2016-11-18T09:43:24+5:302016-11-18T10:46:50+5:30
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी नोटाबंदी निर्णयासंदर्भात दिल्लीतील सरोजनी नगर मार्केटमधील दुकानदारांसोबत चर्चा करण्यासाठी गेले होते.यावेळी मोदी मोदींचे नारेबाजी सुरू करण्यात आली.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - काळा पैसा हद्द पार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500, 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मात्र, पंतप्रधानांच्या या निर्णयाला त्यांच्या विरोधकांकडून तीव्र विरोध दर्शवला जात आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी नोटाबंदी निर्णयासंदर्भात सरोजनी नगर मार्केटमधील दुकानदारांसोबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी रात्री तेथे गेले होते.
यावेळी याठिकाणी भलतच चित्र पाहायला मिळाले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास राहुल गांधी सरोजनी नगर मार्केटमध्ये पोहोचले. त्यांना पाहून लोकं आश्चर्यचकीत झाले. त्यानंतर लोकांनी राहुल गांधी यांना विरोध करत 'नरेंद्र मोदी झिंदाबाद'ची घोषणाबाजी करायला सुरुवात केली.
तर दुसरीकडे मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणारे भाजपाचेच कार्यकर्ते होते. राहुल गांधी यांना विरोध दर्शवण्यासाठी ते मार्केटमध्ये आले होते. दरम्यान, राहुल गांधी मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाचा वारंवार विरोध करत आहेत.
सरोजनी नगर मार्केटआधी त्यांनी दिल्लीतील बँकबाहेर रांग लावली होती, त्यानंतर मुंबईतील एटीएमबाहेर रांगेतील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. याद्वारे नोटाबंदी निर्णयामुळे नागरिकांसमोर समस्या निर्माण झाल्याचे त्यांना सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Delhi: Congress VP Rahul Gandhi visits Sarojini Nagar market to interact with shopkeepers over #Demonitizationpic.twitter.com/1E2hJ0lFcN
— ANI (@ANI_news) 17 November 2016