राहुल गांधी राजकारणातील पप्पू- साक्षी महाराज

By admin | Published: October 9, 2016 10:23 PM2016-10-09T22:23:11+5:302016-10-09T22:23:11+5:30

वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या साक्षी महाराज यांनी आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

Rahul Gandhi's Pappu-Sakshi Maharaj | राहुल गांधी राजकारणातील पप्पू- साक्षी महाराज

राहुल गांधी राजकारणातील पप्पू- साक्षी महाराज

Next

ऑनलाइन लोकमत

उत्तर प्रदेश, दि. 9 - वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या साक्षी महाराज यांनी आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींना मी हिंदू मानत नाही. ते राजकारणातील पप्पू आहेत, अशी वादग्रस्त टीका साक्षी महाराज यांनी राहुल गांधींवर केली आहे. मैनपुरी जिल्ह्यातील तुरुंगात शिक्षा भोगत असलेला भाजप नेता मैदान सिंह राजपूत याची साक्षी महाराज यांनी भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना राहुल गांधींच्या मुद्द्यावर छेडले असता, त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.

साक्षी महाराज म्हणाले, राहुल गांधी हे राजकारणातील पप्पू आहेत. ते उगाचच उत्तर प्रदेशचा दौरा करत आहेत. त्यांना राजकारणात पारंगत होण्यासाठी आणखी बराच अवधी लागणार आहे. मी राहुल गांधींना हिंदू मानत नाही. जर ते हिंदूच नाही तर त्यांचे भारत आणि भारतीय सैनिकांवर कसे प्रेम असणार, असेही ते म्हणाले आहेत. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांनंतर भव्य राममंदिर उभारू, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

वादग्रस्त वक्तव्य आणि साक्षी महाराज हे जणू समीकरणच झालं आहे. दोन वर्षांपूर्वी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी गांधी हत्या करणारा नथुराम गोडसे आपला आदर्श असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय स्तरातून टीका होऊ लागल्यानं पक्षानं त्यांना नोटीस बजावली होती. मात्र त्यावेळी त्यांनी मी असं वक्तव्य केला नसल्याचा घूमजाव केला होता.

Web Title: Rahul Gandhi's Pappu-Sakshi Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.