गुजरातमधील हिंसेसाठी मोदींचे व्देषाचे राजकारण कारणीभूत - राहुल गांधी
By admin | Published: August 27, 2015 03:37 PM2015-08-27T15:37:45+5:302015-08-27T15:45:07+5:30
गुजरातमधील सद्यस्थितीसाठी मोदींचे व्देषाचे राजकारणच कारणीभूत आहे अशी घणाघाती टीका राहुल गांधींनी केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. २७ - पटेल समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गुजरातमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच हल्लाबोल केला आहे. गुजरातमधील सद्यस्थितीसाठी मोदींचे द्वेषाचे राजकारणच कारणीभूत आहे अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे सध्या तीन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौ-यावर असून गुरुवारी पोर शहराजवळील ग्रामीण भागात शेतक-यांची सभा घेतली. या सभेत त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली. मोदी द्वेषाचे राजकारण करत असून अशा राजकारणाचा नेहमीच फटका बसतो. गुजरातमध्ये सध्या दिसणारे चित्र हे त्याचाच परिणाम आहे असे त्यांनी सांगितले. जनतेमध्ये द्वेष पसरावा व त्यांनी एकमेकांशी लढावे हेच त्यांना हवे आहे, याचा फायदा मोदींशिवाय अन्य कोणालाही मिळत नाही असे त्यांनी म्हटले आहे. मोदी सरकार हे सुटबूटवाल्यांचे सरकार आहे असा पुनरुच्चारही त्यांनी केला.