राहुल गांधींच्या बोलण्याने मोदींना गुदगुल्या
By admin | Published: December 22, 2016 12:09 PM2016-12-22T12:09:07+5:302016-12-22T14:50:39+5:30
नोटाबंदी निर्णयावरुन भ्रष्टाचाराचे आरोप करणा-या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा खिल्ली उडवली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
वाराणसी, दि. 22 - नोटाबंदी निर्णयावरुन भ्रष्टाचाराचे आरोप करणा-या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा खिल्ली उडवली आहे. 'राहुल गांधी अजून भाषण शिकत आहेत. जेव्हापासून त्यांनी बोलायला सुरु केलं आहे मला खूप आनंद झाला आहे. बरं झालं या तरूण नेत्यानं भाषणं द्यायला सुरुवात केली नाही तर भुकंप आला असता', असं सांगत मोदींनी राहुल गांधींची खिल्ली उडवली आहे. '2009 पर्यंत या पाकिटात काय आहे कळतच नव्हतं, पण आता हळू हळू कळू लागलं आहे', असंही मोदी बोलले आहेत. महात्मा पंडित मदन मोहन मालविया कॅन्सर सेंटरच्या पायाभरणी कार्यक्रमाला मोदींनी हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते.
राहुल गांधी म्हणतात ज्या देशात 60 टक्के लोक अशिक्षित आहेत तिथे ऑनलाइन व्यवहार कसा करणार. पण हे तुमचंच रिपोर्ट कार्ड आहे असं सांगत मोदींनी पलटवार केला आहे. कोणाचं काळं धन तर कुणाचं काळं मन समोर येत आहे असंही मोदी बोलले आहेत.
सध्या देशभरात साफसफाई अभियान सध्या सुरु आहे. अनेक जणांनी दावा केली की मोदींना निर्णय घेताना अंदाज नव्हता. पण देशातले काही पक्ष विरोधकांसोबत भक्कम उभे राहतील याचा खरंच अंदाज नव्हता असं सांगत मोदींनी विरोधी पक्षांवर टीका केली आहे. सीमारेषेवर ज्याप्रमाणे दहशतवाद्यांना घुसवण्यासाठी फायरिंग केली जाते तसंच काहीस संसदेत चालू आहे असं सांगत विरोधक पाकिस्तानसारखे वागत असल्याचं बोलले आहेत.
सामान्य जनतेला खूप त्रास झाला आहे, मात्र तरीही समर्थन करत आहेत. देशाच्या भल्यासाठी कष्ट सोसण्याची इतकी तयारी जगभरात कुणीच करत नाही असं सांगत मोदींनी लोकांचे आभार मानले.
नोटाबंदी निर्णयावर टीका करणा-या विरोधकांना मोदींनी नावं घेऊन उत्तर दिलं आहे. मनमोहन सिंग, चिदंबरम यांना तुमची वक्तव्ये तुमचा रिपोर्ट कार्ड असल्याचं मोदी बोलले आहेत. मनमोहन सिंग स्वत:चे रिपोर्ट कार्ड देत होते की माझं हेच कळत नव्हतं. ही 50 टक्के गरिबी तुमचंच देणं आहे. चिदंबरम 2014 मध्ये बोलत होते आम्ही विकास केला आहे, आणि आता म्हणतात आपल्या देशातील 50 टक्के गावांमध्ये वीज नाही. हे सर्व तुम्हीच केलं असून तुमचं रिपोर्ट कार्ड असल्याचं सांगत मोदींनी विरोधकांवर पलटवार केला.
नकली नोटांचं 8 नोव्हेंबरला दफन करण्यात आलं आहे. माओवाद, नक्षलवाद, दहशतवाद सगळ्यांना एकत्रच संपवून टाकलं आहे. अनेक नक्षलवादी समर्पण करत आहेत, कारण पैसेच नाही तर जेवायला देणार कोण असं सागंत मोदींनी नोटाबंदी निर्णयाचा फायदा होत असल्याचं सांगितलं आहे.