राहुल गांधींचे दहशतवाद्यांसोबत साटेलोटे

By admin | Published: November 22, 2015 03:03 AM2015-11-22T03:03:22+5:302015-11-22T03:03:22+5:30

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी राजकीय लाभासाठी दहशतवाद्यांसोबत संगनमत करून पंजाबमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा खळबळजनक आरोप

Rahul Gandhi's terrorists satelote | राहुल गांधींचे दहशतवाद्यांसोबत साटेलोटे

राहुल गांधींचे दहशतवाद्यांसोबत साटेलोटे

Next

सुखबीर बादल यांचा आरोप : पंजाबमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा कट; राजकारण पेटले

नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी राजकीय लाभासाठी दहशतवाद्यांसोबत संगनमत करून पंजाबमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा खळबळजनक आरोप या राज्याचे उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांनी शनिवारी केला. सत्ताधारी शिरोमणी अकाली दलाचे (बादल) अध्यक्ष बादल यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन काँग्रेसविरुद्ध कारवाई तसेच या पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी केली. दरम्यान काँग्रेसने बादल यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
दिल्ली दौऱ्यावर आलेले बादल यांनी पत्रपरिषद घेऊन काँग्रेसवर आरोपांच्या फैरी झाडल्या. गेल्या १० नोव्हेंबरला अमृतसरमध्ये आयोजित एका सभेत काँग्रेस नेते फुटीरवादी आणि दहशतवादी तत्त्वांसोबत व्यासपीठावर बसले होते. एवढेच नाही तर या सभेत खलिस्तान स्थापनेसंबंधी प्रस्तावही पारित करण्यात आला, असा दावा त्यांनी केला. पंजाबमधील काँग्रेस नेत्यांनी या सभेच्या आयोजनात फुटीरवाद्यांना भरपूर मदत केली आणि यासाठी त्यांना राहुल गांधी यांचा पूर्ण पाठिंबा होता. काँग्रेस नेते ज्या लोकांसोबत सभेत सहभागी झाले होते त्यांचे पाकिस्तान व त्याची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध आहेत, असे बादल यांचे म्हणणे होते.
काँग्रेस देशद्रोही पक्ष
काँग्रेस हा देशद्रोही पक्ष असल्याचा आरोप करून निवडणूक आयोगाने या पक्षाची मान्यता रद्द करावी; तसेच केंद्रीय गृहमंत्रालयाने या पक्षाच्या हालचालींवर नजर ठेवावी, अशी मागणी सुखबीर बादल यांनी केली. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली असून चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. शिरोमणी अकाली दलाने कधीही दहशतवाद्याच्या सुटकेची मागणी केली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)


अमरिंदरसिंग यांनी आरोप फेटाळले

नवी दिल्ली : काँग्रेस दहशतवादी आणि देशद्रोही शक्तींना पाठिंबा देत असल्याबाबत पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांनी केलेले आरोप लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते अमरिंदरसिंग यांनी फेटाळले आहेत. बादल आपल्या अपयशाचे खापर काँग्रेसवर फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा पलटवारही त्यांनी केला.
 

Web Title: Rahul Gandhi's terrorists satelote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.