पराभवाला राहुल जबाबदार नाहीत - काँग्रेसची स्पष्टोक्ती

By admin | Published: May 20, 2016 09:15 AM2016-05-20T09:15:26+5:302016-05-20T09:15:36+5:30

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे अशा आशयाच्या सूचना गुरुवारी पक्षातर्फे फेटाळण्यात आल्या

Rahul is not responsible for defeat - Congress clarifies | पराभवाला राहुल जबाबदार नाहीत - काँग्रेसची स्पष्टोक्ती

पराभवाला राहुल जबाबदार नाहीत - काँग्रेसची स्पष्टोक्ती

Next
>नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे अशा आशयाच्या सूचना गुरुवारी पक्षातर्फे फेटाळण्यात आल्या. सोबतच पक्षाने गांधींभोवतीचे सुरक्षा कवच अधिक मजबूत केले.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी सरचिटणीस मुकुल वासनिक आणि प्रवक्ता आरपीएन सिंग यांच्यासोबत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, प्रत्येक निवडणुकीचे आपले वेगळे मुद्दे असतात. आम्ही एखाद्या ठरावीक व्यक्तीच्या संदर्भातून मग ते तरुण गोगोई असोत वा ओमन चंडी राज्याच्या निवडणुकांकडे बघत नाही. कुठे सुधारणोची गरज आहे यावर आम्ही सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा करू. सोनिया आणि राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत पराभवाची जबाबदारी स्वीकारली होती. त्याचप्रमाणो या वेळीसुद्धा राहुल यांनी जबाबदारी स्वीकारू नये काय, असा सवाल करण्यात आला असता ही अयोग्य सूचना आम्ही फेटाळून लावतो, असे काँग्रेसचे नेते म्हणाले. काँग्रेस आसाममध्ये 15 वर्षे आणि केरळात गेली पाच वर्षे सत्तेत राहिली आणि सक्षम नेतृत्व दिले याकडे सुरजेवाला यांनी लक्ष वेधले. 
निवडणुकीतील पराभवानंतर प्रियंका गांधी संघटनेत अधिक मोठी भूमिका वठविणार काय, हा प्रश्न अप्रासंगिक असल्याचे सांगून त्यांनी फेटाळला. तर पक्षाला आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, हे वासनिक यांनी मान्य केले. तामिळनाडू, केरळ आणि पुडुच्चेरीत पक्षाचे प्रभारी असलेले वासनिक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, या राज्यांमधील पराभवाची कारणो त्वरित सांगणो शक्य नाही.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवास कॉँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांना जबाबदार धरता येणार नाही, असे कॉँग्रेसचे गोवा प्रभारी दिग्विजय सिंग यांनी म्हटले आहे. कॉँग्रेसच्या दृष्टीने ही चिंतेची गोष्ट असली तरी काँग्रेस पक्ष यातूनही ङोप घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
 
कठोर मेहनत करत राहणार
- राहुल गांधी
काँग्रेसशासित आसाम आणि केरळमध्ये पक्षाचा पराभव आणि पश्चिम बंगाल व तामिळनाडूत फारशी चांगली कामगिरी बजावू न शकल्यानंतर पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस लोकांचा विश्वास प्राप्त करेर्पयत कठोर मेहनत करेल, अशी ग्वाही गुरुवारी दिली. राहुल गांधी टि¦टरवर म्हणाले, आम्ही जनतेचा हा निर्णय नम्रपणो स्वीकारतो आणि निवडणुकीत विजयी  पक्षांना शुभेच्छा देतो. 
 
(वृत्तसंस्था)

Web Title: Rahul is not responsible for defeat - Congress clarifies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.