राहुल यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारावे - काँग्रेसच्या कार्यकारी समितीची मागणी
By admin | Published: November 7, 2016 04:29 PM2016-11-07T16:29:06+5:302016-11-07T17:45:07+5:30
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारून पक्षाचा कारभार आपल्या हाती घ्यावा, अशी मागणी आज काँग्रेसच्या कार्यकारी समितीने केली.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारून पक्षाचा कारभार आपल्या हाती घ्यावा, अशी मागणी आज काँग्रेसच्या कार्यकारी समितीने केली. दरम्यान, आज झालेल्या बैठकीस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आजारपणामुळे अनुपस्थित राहिल्याने कार्यकारी समितीच्या बैठकीचे अध्यक्षपद राहुल गांधी यांनी भुषवले होते.
काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रणदीप सुरजेवाला आणि ए.के.अँटोनी यांनी बैठकीत झालेल्या घडामोडींविषयी माहिती दिली. तसेच सोनिया गांधी यांना अध्यक्षपदी मुदतवाढ देण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली.
आज झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीदरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी संरक्षणमंत्री ए.के.अँटोनी यांनी राहुल यांनी आता पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारावी अशी विनंती केली. राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपद स्वीकारण्यासाठी हीच योग्यवेळ आहे, असे अँटोनवी म्हणाले. त्यानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही या मागणीला अनुमोदन दिले. त्यानंतर कार्यकारी समितीमधील सर्वच सदस्यांनी राहुल यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी केली. तसेच पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन यासंदर्भात त्यांना माहिती द्यावी, असाही निर्णय कार्यकारी समितीने घेतला.
दरम्यान, कार्यकारी समितीच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर चौफेर हल्ला चढवला. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला सत्तेची नशा झाली आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांची मुस्कटदाबी सुरू आहे, असा घणाघात त्यांनी केला.
#FLASH Congress Working Committee members unanimously support Rahul Gandhi's elevation to being President of Congress Party.
— ANI (@ANI_news) November 7, 2016
AK Antony in the meeting said "right time for Rahul Gandhi to take charge as the President of Congress party", other members agreed.
— ANI (@ANI_news) November 7, 2016