राहुल यांची अध्यक्षपदावर बढती पुन्हा लांबणीवर

By admin | Published: June 15, 2016 03:58 AM2016-06-15T03:58:45+5:302016-06-15T03:58:45+5:30

राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याचे विश्वासनीय वृत्त आहे. राहुल गांधींना बढती देऊन पक्षाध्यक्ष बनविण्याची मागणी काँग्रेसमध्ये

Rahul's elevation to postpone prolonged | राहुल यांची अध्यक्षपदावर बढती पुन्हा लांबणीवर

राहुल यांची अध्यक्षपदावर बढती पुन्हा लांबणीवर

Next

- हरीश गुप्ता, नवी दिल्ली

राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याचे विश्वासनीय वृत्त आहे. राहुल गांधींना बढती देऊन पक्षाध्यक्ष बनविण्याची मागणी काँग्रेसमध्ये जोर धरत असली तरी त्यांना नजीकच्या काळात बढती मिळण्याची शक्यता दिसत नाही.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यासाठी बोलावण्यात येणारे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अधिवेशन किमान आणखी दोन महिनेपर्यंत तरी घेण्यात येण्याची शक्यता नाही, असे काँग्रेसमधील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. ‘अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे
अधिवेशन आता आॅगस्टअखेर किंवा सप्टेंबरमध्ये घेण्यात येऊ शकते,’ असे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
काँग्रेसमधील बहुतांश मोठे निर्णय राहुल गांधी हेच घेत असतात. त्यामुळे त्यांचा बढतीने हेतू साध्य होईल असे वाटत नाही. आपण दोन वर्षांपासून ज्या चमूवर विश्वास टाकला, त्या चमूने आपल्या अपेक्षेप्रमाणे काम केले नाही, याची राहुल गांधी यांना फार उशिराने जाणीव झाली आहे. राज्यसभेत पाठविण्यात आलेले मधुसूदन मिस्त्री यांनाही उत्तर प्रदेशातील काँग्रेसमध्ये प्राण फुंकण्यात अपयशच आले आाहे. काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नसणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधी यांचे व्यूहरचनाकार असलेले प्रशांत किशोर यांच्यासोबतही जुळवून घेण्यात मिस्त्री यांना अपयशच आले आहे, असे या सूत्रांनी स्पष्ट केले.
गुलाम नबी आझाद यांना उत्तर प्रदेशमधील प्रभारी सरचिटणीसपदी तर कमलनाथ यांना पंजाब व हरियाणातील प्रभारी सरचिटणीसपदी नियुक्त करण्यात आल्यामुळे राहुल गांधी यांना सोनिया गांधी यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांवरच विश्वास ठेवावा लागला आहे, हे स्पष्ट झाले.

पाच राज्यांतील निवडणुकीवरच अधिक लक्ष
काँग्रेसमध्ये आणखी मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे आणि सरचिटणीस सी.पी. जोशी यांच्याकडे आणखी मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. परंतु तूर्तास राहुल गांधी यांना बढती देऊन पक्षाध्यक्ष बनविण्याऐवजी पुढील वर्षाच्या प्रारंभी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरच अधिक लक्ष देण्याचा काँग्रेसचा मानस आहे.
कमलनाथ हे कधीही राहुल गांधी यांना पसंत नव्हते आणि गेल्या दोन वर्षांपासून त्यांना बाजूला सारण्यात आले होते. परंतु आता त्यांना प्रभारी सरचिटणीस बनविण्यात आल्याने सोनिया गांधी ह्या काँग्रेसमध्ये अधिक सक्रिय भूमिका बजावत असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Web Title: Rahul's elevation to postpone prolonged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.